शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

"छातीला स्पर्श करणं, पायजम्याची नाडी ओढणं 'बलात्कार' नाही" म्हणणाऱ्या हायकोर्टाला SC ने फटकारलं, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 14:48 IST

अलाहबाद उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या वादग्रस्त आदेशाला स्थगिती दिली आहे. अल्पवयीन मुलीच्या छातीला स्पर्श करणे आणि पायजम्याची नाडी खेचणे तसेच तिला पुलाखाली खेचणे हा बलात्कार किंवा बलात्काराचा प्रयत्न हा गुन्हा मानला जाऊ शकत नाही, असा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला होता. अलाहाबाद न्यायालयाने हे कृत्य प्रथमदर्शनी पोस्को कायद्यांतर्गत लैंगिक छळाचा गुन्हा वाटतो असं म्हटलं होतं.

न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती ए.जी. मसीह यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरुद्ध स्वत: दखल घेतली. "ही गंभीर बाब आहे आणि ज्या न्यायमूर्तींनी हा निकाल दिला त्याबद्दल ते पूर्ण असंवेदनशील आहेत. आम्हाला हे सांगताना दुःख होत आहे की, हा निर्णय न्यायमूर्तींच्या संवेदनशीलतेचा पूर्ण अभाव दर्शवतो," असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं.

सर्वोच्च न्यायालयाने सॉलिसिटर जनरल आणि ॲटर्नी जनरल यांना सुनावणीदरम्यान कोर्टाला मदत करण्यास सांगितले आहे. "न्यायमूर्तींनी असे शब्द वापरल्याबद्दल आम्हाला खेद वाटतो. हे प्रकरण स्वतःहून दखल घेण्यात आले आहे. उच्च न्यायालयाचा आदेश आम्ही पाहिला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशातील काही परिच्छेद २४, २५ आणि २६ न्यायाधीशांच्या बाजूने संवेदनशीलतेचा पूर्ण अभाव दर्शवतात आणि हा निर्णय घाईघाईने घेतला गेला असंही नाही. चार महिन्यांनी हा निकाल सुनावण्यात आला आहे. पीडितेच्या आईनेही कोर्टात धाव घेतली आहे आणि तिची याचिकाही त्यात जोडली जावी," असं न्यायमूर्ती गवई म्हणाले.

अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या प्रयत्नाशी संबंधित एका प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने १७ मार्च रोजी हा वादग्रस्त निर्णय दिला होता. त्यानंतर आता अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयावर केलेल्या टिप्पणीवर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारलाही या प्रकरणात नोटीस बजावली आहे.

'वी द वुमन ऑफ इंडिया' या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने ज्येष्ठ वकील शोभा गुप्ता यांनी पाठवलेल्या पत्राच्या आधारे ही सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली. पीडित मुलीच्या आईच्या म्हणण्यांनुसार, आरोपी पवन आणि आकाशने ११ वर्षीय पीडितेचे स्तन पकडले आणि आकाशने तिच्या पायजमाची नाडी तोडली आणि तिला पुलाखाली ओढण्याचा प्रयत्न केला होता.

याप्रकरणी आरोपी पवन आणि आकाश या दोघांना  कासगंज कोर्टाने बलात्कार आणि पॉस्को कलम १८ अंतर्गत समन्स बजावले होते. त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर त्यावर न्यायाधीश राम मनोहर नारायण मिश्रा यांच्या खंडपीठाने हे कृत्य बलात्कार किंवा बलात्काराचा प्रयत्न केल्याचे आरोप लावण्यास पुरेसे नाही असे निरीक्षण नोंदवलं होतं. तसेच आरोपींवर पॉक्सो खटला चालवावा असे निर्देश दिले आहेत.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयUttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी