शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

पॉर्न पाहणे गुन्हा आहे का? सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं प्रकरण, वाचा काय कायदा सांगतो...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 2:31 PM

सोशल मीडियावरील असा आक्षेपार्ह मजकुर लैंगिक गुन्ह्यांना प्रोत्साहन देत असल्याचा याचिकेत दावा

obscene adult content on social media, supreme court of India: सोशल मीडियावरील अश्लील मजकूराचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. बालरोग शल्यचिकित्सक संजय कुलश्रेष्ठ यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह साहित्य असू नये याची केंद्र सरकारने खात्री करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली. अशी सामग्री लैंगिक गुन्ह्यांना प्रोत्साहन देते तसेच मोबाईल इंटरनेटच्या माध्यमातून याचा प्रचार केला जात असून अल्पवयीन मुलींवरील लैंगिक गुन्ह्यांमध्ये वाढ होण्याचे कारण बनत असल्याचेही याचिकेत म्हटले आहे. मात्र, अशा आशयाचे प्रकरण न्यायालयात पोहोचण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशा परिस्थितीत भारतात अश्लिल मजकूर पाहणे हा गुन्हा आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत देशाचा कायदा काय सांगतो, जाणून घेऊया.

पॉर्न व्हिडिओ पाहणे गुन्हा आहे का?

सर्वोच्च न्यायालयाचे वकील आशिष पांडे म्हणतात की, भारतात अश्लील साहित्याबाबत अनेक कायदे आहेत. आरोपी कोणत्या प्रकारचा मजकूर पाहत आहे आणि तो कुठे पाहतोय यावर काय शिक्षा होईल हे अवलंबून आहे. कारण हे मोठे घटक आहेत. उदाहरणार्थ, जर एखादा प्रौढ सामान्य पोर्न सामग्री पाहत असेल जो त्या विशिष्ट लक्ष्य गटासाठी तयार केला गेला असेल, तर तो गुन्हा नाही. यासाठी कोणतीही शिक्षा नाही.

ही वैयक्तिक पसंतीची बाब!

भारतीय राज्यघटनेत गोपनीयतेशी संबंधित काही तरतुदी आहेत, ज्यांच्या अंतर्गत त्या गोष्टी बेकायदेशीर असल्याशिवाय त्यावर बंदी घालता येत नाही. न्यायमूर्ती पीव्ही कुन्हीकृष्णन यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये केरळ उच्च न्यायालयात एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान ही टिप्पणी केली होती. असे प्रकरण गुन्ह्याच्या श्रेणीत आणता येणार नाही, असे ते म्हणाले होते. ही व्यक्तीच्या वैयक्तिक पसंतीची बाब आहे. अशा प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करणे हे नागरिकांच्या गोपनीयतेत हस्तक्षेप करण्यासारखे आहे.

'या' प्रकारच्या अश्लील मजकुरावर शिक्षा होईल!

आशिष पांडे सांगतात, काही खास प्रकारचा अश्लील मजकूर आहे, तो पाहणे गुन्हा आहे. जर कोणी चाइल्ड पोर्नोग्राफी पाहत असेल किंवा एखाद्या महिलेसोबत काहीतरी चुकीचे वागत असेल तर ते गुन्ह्याच्या श्रेणीत येते. यासाठी आरोपींना शिक्षा होऊ शकते. त्याच बरोबर चाइल्ड पोर्नोग्राफी पाहिल्यास POCSO कायद्यांतर्गत शिक्षेचीही तरतूद आहे.

किती वर्षांच्या शिक्षेची तरतूद?

आयटी कायद्याच्या कलम 67 नुसार हा नियम न पाळल्यास ३ वर्षांची शिक्षा होऊ शकते. चाइल्ड पोर्नोग्राफीशी संबंधित कलम 67A आणि 67B नुसार अशी सामग्री खाजगीत पाहणे गुन्ह्याच्या श्रेणीत येते. अशा वेळी मी एकटाच पाहत होतो, असेही म्हणता येणार नाही. तसेच फोनवर फोटो सर्च करून ते सोशल मीडियावर पोस्ट करणेही गुन्हाच आहे. IPC कलम 292 नुसार, जर कोणी पोर्नोग्राफी सामग्री तयार किंवा वितरित करत असेल, तर तो गुन्हा आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयSocial Mediaसोशल मीडिया