नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाची वेबसाईट हॅक झाली आहे. ब्राझीलच्या हॅकर्सनी हे कृत्य केलं आहे. या हॅकर्सनी 2013 मध्ये अनेक भारतीय वेबसाईट्स हॅक केल्या होत्या. काही दिवसांपूर्वी गृह मंत्रालयाची वेबसाईट हॅक झाल्याचं वृत्त होतं.
सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर (supremecourtofindia.nic.in) सध्या एका पानाचं चित्र दिसतं आहे. काही दिवसांपूर्वी संरक्षण मंत्रालयाची वेबसाईटदेखील हॅक झाली होती. यामागे चिनी हॅकर्सचा हात होता. यानंतर संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट केलं होतं. 'याप्रकरणी पावलं उचलण्यात आली असून लवकरच वेबसाईट सुरू होईल,' असं ट्विट त्यावेळी सीतारामन यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. या वर्षाच्या सुरुवातीला गृह मंत्रालयाची वेबसाईटदेखील हॅक झाली होती.