शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
4
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
5
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
6
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
7
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
8
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
9
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
10
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
12
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
13
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
14
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
15
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
16
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
17
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
18
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ

सर्वोच्च न्यायालय करणार सीबीआयच्या कामगिरीचे मूल्यमापन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2021 5:45 AM

पूर्ण प्रकरणे, शिक्षेचा मागविला तपशील

ठळक मुद्देअतिरिक्त सॉलिसिटर जनरल संजय जैन यांनी न्यायालयाला सांगितले की, भारतासारख्या गुंतागुंतीच्या न्यायवस्थेत किती खटल्यांचा निकाल लागला

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयच्या कामगिरीचे मूल्यमापन करायचे ठरविले आहे. सीबीआयने किती प्रकरणांचा तपास यशस्वीरीत्या पूर्ण केला व त्यातील किती आरोपींना न्यायालयांनी  शिक्षा सुनावली याचा सविस्तर तपशील सीबीआय प्रमुखांकडून सर्वोच्च न्यायालयाने मागविला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. संजय किशन कौल व न्या. एम. एम. सुंदरेश यांनी सांगितले की, सीबीआयने एखाद्याप्रकरणी गुन्हा नोंदविला व त्याची चौकशी केली इतकेच पुरेसे नाही. या तपासांनंतर आरोपीला शिक्षा झाली का हेही या तपासयंत्रणेने पाहायला हवे. त्यामुळे सीबीआयची कार्यक्षमता तपासून बघण्याचे न्यायालयाने ठरविले आहे. सीबीआय आपले कर्तव्य नीटपणे पार पाडत नसल्यामुळे अनेक गुन्ह्यांप्रकरणी खटले दाखल करण्यास दिरंगाई होत असल्याची टीका झाली होती. त्यामुळे नेमकी वस्तुस्थिती जाणून घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने ठरविले आहे.

अतिरिक्त सॉलिसिटर जनरल संजय जैन यांनी न्यायालयाला सांगितले की, भारतासारख्या गुंतागुंतीच्या न्यायवस्थेत किती खटल्यांचा निकाल लागला हा कार्यक्षमतेच्या मोजमापाकरिता अनेक घटकांपैकी एक घटक असला पाहिजे. हा मापदंड साऱ्या जगभरात वापरला जातो. सीबीआय हा तर पिंजऱ्यातील पोपटकोळसा घोटाळ्याबद्दलच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने ८ मे २०१३ रोजी म्हटले आहे की, सीबीआय हा पिंजऱ्यातील पाळीव पोपट असून, तो फक्त मालकाची भाषा बोलतो. केवळ सरकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधणे इतकेच सीबीआयचे काम नसून एखाद्या गुन्ह्यातील सत्य शोधून काढणे हे या यंत्रणेचे खरे काम आहे. न्यायाधीशांबाबतही सीबीआयची ढिलाईसर्वोच्च न्यायालयाने गेल्या ६ ऑगस्ट रोजी म्हटले आहे की,  विविध न्यायालयांच्या न्यायाधीशांना धमकावले जात आहे. अशा दोन-तीन प्रकरणांत सीबीआयने चौकशी करावी, असा आदेश न्यायालयाने दिला; पण त्यानंतरच्या एक वर्षात सीबीआयने तपासासाठी काहीही हालचाल केली नाही. ...तरच आरोपपत्र आमदार, खासदारांविरोधातील गुन्ह्यांच्या तपासात काहीही पुरावे आढळले तरच सीबीआयने आरोपपत्र सादर करावे. अन्यथा त्या प्रकरणाचा तपास बंद करावा. कोणावरही टांगती तलवार ठेवू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने २५ ऑगस्ट रोजी म्हटले.

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCBIगुन्हा अन्वेषण विभाग