ज्ञानवापी मशिदीसंदर्भातील वादावर सुनावणी करताना आज सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जिला प्रशासनाला आदेश देत, ज्या ठिकाणी 'शिवलिंग' आढळून आले, ते ठिकाण सील करण्यात यावे आणि त्याला संपूर्ण सुरक्षा देण्यात यावी. तसेच, नमाजमध्येही व्यत्यय येऊ नये, असे म्हटले आहे.
याच बरोबर सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी गुरुवारची तारीख निश्चित केली आहे. सर्वोच्च न्यायालय निर्णय देताना म्हणाले, 'पुढील सुनावणीपर्यंत आपण वाराणसी डीएम यांना आदेश देत आहोत, की शिवलिंग आढळून आलेल्या स्थळाचे संरक्षण करण्यात यावे. पण, मुस्लीम समाजाला नमाज पठणासाठी कुठल्याही प्रकारची समस्या येऊ नये.'यावर उत्तर प्रदेशचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले, की मशिदीतील वझूखान्यात म्हणजेच हात-पाय धुण्याच्या ठिकाणी शिवलिंग सापडले आहे. प्रार्थनेचे ठिकाण वेगळे आहे. या ठिकाणी शिवलिंगाला इजा पोहोचण्याची शक्यता आहे. नमाजची जागा वेगळी असते.
न्यायालय म्हणाले, आम्ही खालच्या कोर्टाला आपल्या याचिकांवर लवकरात लवकर सुनावणीचे निर्देश देत आहोत. यावर मुस्लिम पक्षाचे वकील म्हणाले, पण आपण परिसर कशा प्रकारे सील करत आहात? आपण स्थिती बदलत आहात. हे आमची बाजू न ऐकताच IA मध्ये पास झाले आहे. हे सर्व आदेश अवैध आहेत. हे आमचे म्हणणे ऐकल्या शिवाय संपत्ती सील करण्यासारखे आहे. आपण मशिदीत नमाजची जागाही मर्यादित करत आहात.