नवी दिल्ली : अनुसूचित जाती, जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दलितांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या निर्णयामुळे सवर्णांच्या मनात भीती राहिली नाही, असा दावा भाजपचे संसद सदस्य उदित राज यांनी केला आहे. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात आरक्षण असावे अशी मागणीही त्यांनी केली.उदित राज म्हणाले की, सरकार संयुक्त सचिव दर्जाचे काही पदे थेट खासगी संस्थांमधून भरणार आहे. या पदांसाठी आरक्षणाची मागणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना करणार आहोत. जळगाव, मेहसाणा आदी ठिकाणी झालेले दलित अत्याचार व अॅट्रॉसिटीबाबत २० मार्च रोजीचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय याबाबत विचाता उदित राज म्हणाले की, अशा घटनांत वाढ झाली आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने दलित अत्याचारात वाढ, उदित राज यांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 3:46 AM