ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - एमबीबीएस आणि बीडीएसच्या विद्यार्थ्यांसाठी NEET (नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट) ही सामाईक प्रवेश परीक्षा घेण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केला आहे. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया व सीबीएसई यांची परीक्षा 1 मे रोजी पहिल्या टप्प्यात घेणार आहे. तर दुसऱ्या टप्प्याची परीक्षा 24 जुलै रोजी होईल आणि एकत्रित निकाल 17 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या सामाईक प्रवेश परीक्षेच्या निर्णयाची संभावना तामिळनाडू व कर्नाटक या राज्यांनी घटनाबाह्य केली होती आणि कोर्टात धाव घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने या वादावर पडदा टाकताना NEETला हिरवा कंदील दाखवला आहे.