कंगना संदर्भातील 'ती' घाणेरडी पोस्ट सुप्रिया श्रीनेत यांच्या अंगलट, NCW अॅक्शन मोडवर; भाजपही आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 09:51 AM2024-03-26T09:51:12+5:302024-03-26T09:52:53+5:30
श्रीनेत यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून कंगना संदर्भात एक आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती. ही पोस्ट नंतर हटविण्यातही आली. यावर आपल्या अकांउटचा अॅक्सेस दुसऱ्याकडे गेला होता, यामुळे ही गडबड झाली, असे सुप्रिया श्रीनेत यांचे म्हणणे आहे. अर्थात आपण ही पोस्ट केली नाही, असा दावा श्रीनेत यांनी केला आहे.
काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी चित्रपट अभिनेत्री तथा मंडी लोकसभा मतदारसंघाची भाजप उमेदवार असलेल्या कंगना रणौत संदर्भात एक घाणेरडी अथवा अश्लील पोस्ट केली होती. हे प्रकरण आता त्यांच्याच अंगलट येताना दिसत आहे. या प्रकरणानंतर भारतीय जनता पक्ष तर आक्रमक झालाच आहे. पण आता राष्ट्रीय महिला आयोगही अॅक्शन मोडवर आला आहे. कंगना रणौत विरोधात करण्यात आलेल्या अश्लील टिप्पणी संदर्भात काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आयोग निवडणूक आयोगाकडे करेल, असे राष्ट्रीय महिला आयोगाने म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणावर सुप्रिया श्रीनेत यांना उत्तर देताना, "प्रत्येक महिला तिच्या सन्मानास पात्र आहे," असे कंगनाने म्हटले आहे.
श्रीनेत यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून कंगना संदर्भात एक आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती. ही पोस्ट नंतर हटविण्यातही आली. यावर आपल्या अकांउटचा अॅक्सेस दुसऱ्याकडे गेला होता, यामुळे ही गडबड झाली, असे सुप्रिया श्रीनेत यांचे म्हणणे आहे. अर्थात आपण ही पोस्ट केली नाही, असा दावा श्रीनेत यांनी केला आहे.
निवडणूक आयोगाकडे तक्रार -
यासंदर्भात बोलताना, एनसीडब्ल्यूच्या अध्यक्ष रेखा शर्मा म्हणाल्या, यासंदर्भात आपण निवडणूक यागोशी संपर्क साधणार आहोत. भाजपचे सदस्य तजिंदर बग्गा यांनी हा मुद्दा उचलल्यानंतर, शर्मा यांनी एक्सवर प्रतिक्रिया देत, "कंगना राणौत आपण एक योद्धा आणइ चमकणारा तारा आहात. ज्या लोकांना असुरक्षित वाटते ते लोक घाणेरडा प्रकार करतात. अशीच चमकत रहा. माझ्या शुभेच्छा तुझ्यासोबत आहेत. तजिंदर बग्गा निवडणूक आयोगाला पत्र लिहीत आहे."
भाजप नेते आक्रमक -
यासंदर्भात, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव तजिंदर बग्गा यांनी म्हटले आहे की, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा समोर आला आहे. राहुल गांधी यांच्या जवळच्या असलेल्या सुप्रिया यांनी काँग्रेसचा नेहरूवादी चेहरा दाखवला आहे. या शिवाय, भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे, हे घृणास्पद आहे. कंगना राणौतवर श्रीनेत यांची अशी कमेंट अत्यंत लाजिरवाणी आहे. प्रियंका गांधी या संदर्भात काही बोलणार का? काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सुप्रिया श्रीनेत यांना हटविणार का? हातरस लॉबी आता कुठे आहे? असे सवालही पुनावाला यांनी केले आहेत.