नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, कामकाजाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कोरोना आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून प्रश्नांची सरबत्ती करत केंद्रातील मोदी सरकारला घेरले.सुप्रिया सुळेंनी लोकसभेतील आजच्या कामकाजाबाबतचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करून याबाबतची माहिती दिली. त्यात त्या म्हणाल्या, ह्यह्णलोकसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बेरोजगारी आणि कोरोनाचा विषय सभागृहात मांडला. कोरोनामुळे आपल्यासह जगभरातील बहुतांश देशांना मोठा फटका बसला.यामुळे झालेली हानी भरुन काढण्यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना हाती घेण्याची नितांत आवश्यकता आहे. परंतु असं होताना दिसत नाही, अशी टीका सुळे यांनी केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले
शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी