शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सुनावणी आधीच बदलला राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील बोर्ड; नेमकं कारण काय?
2
माजी आमदाराला १०० ग्रॅम हेरॉईन विकताना पकडले; कारने पळताना भाच्याने पोलिसालाही उडविले
3
उमेदवारी अर्ज दाखल करायला जाताना भुजबळांचं जोरदार शक्तीप्रदर्शन, हाती घेतला भाजपचा झेंडा; म्हणाले...
4
यशस्वी डाव! वॉशिंग्टनची 'सुंदर' गोलंदाजी; चेंडू कसा वळला ते रचिनसह टॉमलाही नाही कळलं (VIDEO)
5
सीएम ओमर अब्दुल्लांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
6
एक आयडिया आणि आई-मुलाची जोडी ठरली सुपरहिट; वर्षाला करतात ५० लाखांची कमाई
7
अखेर ठरलं! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
8
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या तेजीला ब्रेक, १४४२ रुपयांनी स्वस्त झाली चांदी; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
9
इथे ठाकरे गटाशी युती तोडली, तिथे संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज जरांगेंच्या भेटीला; चर्चांना उधाण
10
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
11
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा
12
Ratnagiri Assembly Elections 2024: मशाल पेटणार की, पुन्हा धनुष्यबाण! रत्नागिरीत गणित कसं?
13
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!
14
संजय राऊत यांनी आमच्या मतदारसंघाचे तिकीट विकले; पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप 
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणातील आरोपीचं झिशान अख्तरशी कनेक्शन; कुटुंबीय म्हणतात...
16
Airtel ची कमाल, 'या' ३ प्लॅन्ससोबत देतेय ५ लाखांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स; पाहा डिटेल्स
17
"या राज्यात एका जातीच्या बळावर...!", मनोज जरांगे यांचं मोठं विधान; असं जुळवणार राजकीय समीकरण
18
R Ashwin ची टॉप क्लास कामगिरी! नावे झाला WTC च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड
19
Kalyan: भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
20
दिवाळीत बँका किती दिवस बंद असणार? उसळलीय मोठी गर्दी, शेड्यूल बघून घ्या...

हातात भाकरी घेऊन रेल्वेखाली चिरडलेल्या मजुरांचे मृतदेह सरकारला दिसले नाहीत का? सुप्रिया सुळेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 5:08 PM

या स्थलांतरादरम्यान, अनेक मजुरांचा मृत्यू झाला होता. मात्र या मजुरांची नोंद आपल्याकडे नाही. त्यामुळे त्यांना मदत देण्याचा प्रश्नच उदभवत नसल्याचा दावा केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने केला होता.

ठळक मुद्देस्थलांतरीत मजुरांच्या मृत्यूबाबत अतिशय संतापजनक बाब असून, ही असंवेदनशीलता कोणत्याही व्यक्तीला चीड आणणारीकेंद्राने घाईघाईने लॉकडाऊन जाहीर केल्याने अनेक गरीब मजूरांना स्थलांतर करावे लागले गोरगरीबांचे हे हाल केंद्र सरकारच्या लक्षात आले नाहीत का?

मुंबई - कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान मजुरांनी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केले होते. या स्थलांतरादरम्यान, अनेक मजुरांचा मृत्यू झाला होता. मात्र या मजुरांची नोंद आपल्याकडे नाही. त्यामुळे त्यांना मदत देण्याचा प्रश्नच उदभवत नसल्याचा दावा केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने केला होता. त्यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे.सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ''केंद्र सरकारने दिलेल्या या स्पष्टीकरणावर टीका करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ''केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने स्थलांतरीत मजूरांची नोंद आपल्याकडे नाही त्यामुळे त्यांना मदत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे कळविले आहे. ही अतिशय संतापजनक बाब असून, ही असंवेदनशीलता कोणत्याही व्यक्तीला चीड आणणारी आहे.''''सुरुवातीला कोरोनाचे कुठलेही गांभीर्य न ओळखलेल्या सकरारने नंतर मात्र कसलेही नियोजन न करता अतिशय घाईघाईने लॉकडाऊन जाहीर केलं. त्यामुळे अनेक गरीब मजूरांना उपाशीपोटी, हजारो किलोमीटर रस्त्याने पायी चालत जायला भाग पडले. त्यापैकी अनेकांनी रस्त्यातच प्राण सोडले. गोरगरीबांचे हे हाल केंद्र सरकारच्या लक्षात आले नाहीत का? रेल्वे रुळावर हातात भाकरी घेऊन झोपेतच कटलेल्या मजूरांचे मृतदेह केंद्र सरकारला दिसले नाहीत का? बापाच्या खांद्यावर भुकेने व्याकूळ होऊन मरण पावलेल्या लेकरांचा टाहो ऐकायला आला नाही का? ही असंवेदनशीलता भयावह आहे,'' असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला. 

मृत्युमुखी पडलेल्या स्थलांतरित मजुरांबाबत केंद्र सकारने केला होता असा दावाकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्चमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊनमुळे रोजगार गमावलेल्या लाखो मजुरांनी शहरातून गावांकडे स्थलांतर केलं. घराकडे चालत निघालेल्या अनेक मजुरांचा रस्त्यात मृत्यू झाला. मात्र मृत्यूमुखी पडलेल्यांची कोणतीही आकडेवारी सरकारकडे नसल्याचं उत्तर केंद्रीय कामगार मंत्रालयानं लोकसभेत दिलं होतं. मृत्यूमुखी पडलेल्यांची आकडेवारीच नसल्यानं भरपाई देण्याचा प्रश्नच येत नसल्याचं सरकारनं लोकसभेत सांगितलं होतं. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक मजुरांचा रोजगार गेला. बेरोजगार झालेल्या मजुरांनी घरची वाट धरली. त्यातील किती मजुरांनी जीव गमावला आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोणती भरपाई देण्यात आली, असे प्रश्न सरकारला विरोधकांकडून विचारण्यात आले होते. त्यावर मृत मजुरांची आकडेवारीच नसल्यानं भरपाई देण्याचा प्रश्नच येत नसल्याचं उत्तर सरकारकडून देण्यात आलं. यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं होतं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याLabourकामगारMigrationस्थलांतरणDeathमृत्यूSupriya Suleसुप्रिया सुळे