शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

सूरज रेवन्नाही सेक्स स्कँडलमध्ये अटकेत; जेडीएस कार्यकर्त्याने लैंगिक शोषणाचा केला होता आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 9:01 AM

होलेनर्सीपुरा ग्रामीण पोलिसांनी शनिवारी आयपीसी कलम ३७७, ३४२, ५०६ आणि ३४ अंतर्गत लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी सूरज रेवन्ना आणि शिवकुमार या दोघांना आरोपी बनवले आहे.

कर्नाटकातील सेक्स स्कँडल प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. प्रज्वल रेवन्ना याचा भाऊ सूरज रेवन्ना यालाही हसन पोलिसांनी अटक केली आहे. सूरज यांच्यावर जेडीएस कार्यकर्त्यासोबत अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. कर्नाटकातीलपोलिसांनी शनिवारी जेडीएस एमएलसी सूरज रेवन्ना याच्याविरुद्ध २७ वर्षीय तरुण पक्षाच्या कार्यकर्त्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सूरज रेवन्ना यांच्या जवळच्या सहाय्यकाने कथित पीडितेविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे.

सूरज रेवन्ना याचा सहकारी शिवकुमार यांनी आरोप केला होता की, त्या व्यक्तीने ५ कोटी रुपयांची मागणी केली आणि नंतर २ कोटी रुपयांमध्ये सेटलमेंट केली. होलेनर्सीपुरा ग्रामीण पोलिसांनी शनिवारी आयपीसी कलम ३७७, ३४२, ५०६ आणि ३४ अंतर्गत लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी सूरज रेवन्ना आणि शिवकुमार या दोघांना आरोपी बनवले आहे.

गृहमंत्री अमित शहा आज उच्चस्तरीय बैठक घेणार; पूर परिस्थितीशी सामना करण्याच्या तयारीचा आढावा घेणार

गुन्हा नोंदवण्यापूर्वी पीडितेने राज्याचे गृहमंत्री आणि पोलिस महासंचालकांकडे लेखी तक्रार केली होती. एफआयआरनुसार, पीडित मुलगी १६ जून रोजी संध्याकाळी ६.१५ वाजता हसन जिल्ह्यातील होलेनारसीपुरा येथील फार्महाऊसवर सूरज रेवन्नाला भेटण्यासाठी गेली होती. आमदाराने तिचे कपडे काढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि याबाबत कोणाशी बोलल्यास कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप फिर्यादीत आहे. सूरज रेवन्ना याने आपल्याला नोकरी लावून राजकारणात आणण्याचे आश्वासन दिल्याचा आरोपही फिर्यादीत आहे.

महिलेने ५ कोटींची मागणी केली

तक्रारीत म्हटले आहे की, 'मी शिवकुमार यांना घटनेची माहिती दिली आणि मी न्यायासाठी लढणार असल्याचे सांगितले. नंतर शिवकुमारने तोंड न उघडण्याच्या बदल्यात मला २ कोटी रुपये देऊ केले. माझ्या जीवाला धोका आहे या भीतीने मी बेंगळुरूला आलो. मी माझ्या आरोपांच्या समर्थनार्थ पुरावे द्यायला तयार आहे. त्या व्यक्तीने खोटे आरोप केल्याचा आरोप शिवकुमार यांनी केला होता. त्याऐवजी तो पैसे उकळत आहे. त्या महिलेने ५ कोटींची मागणी केली आणि नंतर २ कोटी रुपयांमध्ये तगादा लावला.

शिवकुमारच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी शुक्रवारी कथित पीडितेविरुद्ध आयपीसी कलम ३८४, ५०६ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. सूरज आणि प्रज्वल हे जेडीएस आमदार एचडी रेवन्ना आणि भवानी रेवन्ना यांची मुले आहेत. एचडी रेवन्ना आणि त्यांची पत्नी भवानी यांच्यावर प्रज्वलच्या कथित लैंगिक अत्याचार पीडितांपैकी एकाचे अपहरण केल्याचा आरोप आहे. हसनमधील जेडीएसचे माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना लैंगिक छळाच्या तीन प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकPoliceपोलिस