मुंबई - गुजरातमधील महापालिका निवडणुकीत भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलंय. तर, अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने चांगलं यश मिळवलंय. गुजरातच्या सुरतमध्ये तब्बल 27 जागा आम आदमी पक्षाने जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसला सुरतमध्ये एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे, येथील महापालिकेत आता प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आम आदमी पार्टीच भूमिका बजावेल. गुजरात निवडणुकीतील यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही गुजरातमधील जनतेचे आभार मानले आहेत. तर, केजरीवालाचंही ट्विट चर्चेचा विषय बनलंय.
भाजपाने सहाही महापालिकांमध्ये आपली सत्ता कायम ठेवली आहे. आत्तापर्यत भाजपाने 449 जागांवर विजय मिळवला असून काँग्रेसला केवळ 44 जागांवर विजय मिळाला आहे. अहमदाबादमध्ये भाजपाने 143 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसला केवळ 15 जागांवर आघाडी मिळाली. सुरतमध्ये आम आदमी पक्षाला चांगलं यश मिळालं आहे. आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीतील कॅबिनेटमंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. गुजरात हा मोदींचा गड आहे, तर सुरत हा भाजपा नेते सी आर. पाटील यांचा गड. तरीही, आपने येथील महापालिका निवडणुकीत 27 जागा जिंकल्या, काँग्रेसला भोपळा मिळाला. त्यामुळे, आप हाच पक्ष प्रमुख विरोधी पक्ष असणार आहे, असे गौतम यांनी ट्विट करुन सांगितलंय. तर, भाजपा हा सत्ताधारी पक्ष असेल.
गुजरातमधील महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विटरवरुन गुजरातच्या जनतेचे आभार मानले आहेत. तसेच, लोकांनी भाजपावर विश्वास दाखवला, राजकारणापलिकडे जाऊन विकास आणि चांगल्या सरकारला प्राधान्य दिल्याचे मोदींनी म्हटलंय.
गुजरातमधील महापालिका निवडणुकीत भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलंय. तर, अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने चांगलं यश मिळवलंय. गुजरातच्या सुरतमध्ये तब्बल 27 जागा आम आदमी पक्षाने जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसला सुरतमध्ये एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे, येथील महापालिकेत आता प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आम आदमी पार्टीच भूमिका बजावेल.
केजरीवाल यांचही ट्विटगुजरातमधील महापालिका निवडणुकीत भाजपाला चांगलं यश मिळाल आहे. मात्र, कायम भाजपाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमधील निवडणुकांच्या निकालानंतर केलेलं ट्विट चांगलंच चर्चेत आलंय. केजरीवाल यांनी आपल्या ट्विटरवरुन गुजरातमधील नागरिकांचे अभिनंदन केलंय. नवीन राजकारणाची सुरुवात करण्यासाठी गुजरातच्या लोकांना मनापासून शुभेच्छा, अभिनंदन ! असे केजरीवाल यांनी म्हटलंय. केजरीवाल यांच्या पक्षानेही महापालिका निवडणुकीत उमेदवार उभे केले होते. विशेष म्हणजे आपला येथील निवडणुकीत चांगलं यशही मिळालं आहे. त्यामुळे, केजरीवाल यांचं ट्विट चर्चेत आलं आहे.