गांधीनगर: देशात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं सगळे विक्रम मोडीत काढले आहेत. गेल्या आठवड्याभरात देशात दररोज कोरोनाचे १ लाखाहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. मागील ४ दिवसांत तर हा आकडा दीड लाखाच्या पुढे गेला आहे. महाराष्ट्र, दिल्लीपाठोपाठ आता गुजरातमध्येही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. शहरातील अनेक रुग्णलयं कोरोना रुग्णांनी भरली असून अनेकांना वेळेत उपचार मिळत नाहीएत. स्मशानभूमीतही अंत्यसंस्कारासाठी वेटिंग लागल्याचं भीषण चित्र गुजरातमधल्या सूरत शहरात पाहायला मिळत आहे.कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टर विनामास्क फिरला; रुग्ण तपासले, सामूदायिक नमाजाला गेलासूरतमध्ये तीन प्रमुख स्मशानभूमी आहेत. या तिन्ही स्मशानातील शवदाहिन्या सध्या दिवसाचे २४ तास सुरू आहेत. कोरोना मृतांचा आकडा वाढतच चालल्यानं स्मशानभूमीत दिवसभर अंत्यसंस्कार सुरू आहेत. परिस्थिती इतकी भीषण आहे की सतत सुरू असलेल्या अंत्यसंस्कारांमुळे स्मशानातील शवदाहिनी आणि चिमण्या वितळण्याची वेळ आली आहे. दिवसभर होत असलेल्या अंत्यविधींमुळे शवदाहिनीत वापरलं जाणाऱ्या लोखंडाचा आकारदेखील बदलू लागला आहे....तसा कुठलाच पुरावा नाही! WHOच्या स्पष्टीकरणानं सगळ्यांची चिंता वाढवलीसूरतमधील अवस्था अतिशय भयंकर आहे. शहरातील तीन मुख्य स्मशानभूमींमध्ये दिवसरात्र अंत्यसंस्कार सुरू आहेत. त्यामुळे शवदाहिनीत वापरण्यात आलेल्या लोखंड वितळू लागलं आहे. सरकारी वाहनांसोबतच खासगी गाड्यांमधूनही अनेकजण मृतदेह घेऊन स्मशानभूमीत येत आहेत. रामनाथ घेला स्मशानभूमीत सर्वाधिक अंत्यसंस्कार होत आहेत. इथे दिवसाकाठी सरासरी १०० जणांचे अंत्यविधी होत आहेत. त्यामुळे २४ तास शवदाहिनी सुरू ठेवावी लागत आहे.स्पुटनिक व्ही लसीला DCGIची मंजुरी; जाणून घ्या किंमत अन् कितपत प्रभावीसूरतमध्ये कोरोना मृतांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. स्मशानभूमीतल्या शवदाहिन्या २४ तास सुरू असूनही अंत्यसंस्कारासाठी मृतांच्या नातेवाईकांना रांगा लावाव्या लागत आहेत. गुजरातमध्ये आतापर्यंत ३ लाख ५३ हजार ५१६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ४ हजार ८५५ जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादमध्ये सर्वाधिक ८४ हजार ८३२ जणांचा कोरोनाची लागण झाली आहे. तर सूरतमध्ये ७६ हजार ४११ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
CoronaVirus News: भीषण! भयंकर!! भयावह!!! दिवस-रात्र जळताहेत मृतदेह, दाहकतेनं शवदाहिन्याही वितळल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 1:40 PM