हमारा मालिक 'हिरा' है... १ हजार कर्मचाऱ्यांना कुटुंबासह १४ दिवस उत्तराखंडची यात्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 06:50 PM2022-11-07T18:50:32+5:302022-11-07T19:10:57+5:30
एका डायमंड कंपनीच्या मालकाने कंपनीतील १ हजार कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचं समाधान होईल, असं गिफ्ट दिलं आहे.
मुंबई - नुकतेच मोठ्या उत्साहात देशभरात दिवाळी साजरी झाली. दिवाळीच्या सणानिमित्त कंपन्यांनी, मालकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसही दिला. तामिळनाडूतील एका ज्वेलर्स शॉपच्या मालकाने चक्क कर्मचाऱ्यांना चारचाकी आणि दुचाकी गाड्या दिवाळी बोनस म्हणून भेट दिल्याचं आपण पाहिलं. आता, गुजरातच्यासूरतमधील एका डायमंड कंपनीच्या मालकाने कंपनीतील १ हजार कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचं समाधान होईल, असं गिफ्ट दिलं आहे.
सूरतच्या श्री रामकृष्ण एक्सपोर्ट्स प्राइवेट लिमिटेडचे संस्थापक आणि अध्यक्ष गोविंद ढोलकिया यांनी जवळपास 1000 कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी तब्बल १४ दिवस उत्तराखंडच्या यात्रेचं आयोजन केलं आहे. सूरतच्या ऋषिकेशच्या यात्रेसाठी SRK गंगे एक्सप्रेसची एक स्पेशल ट्रेनच बुक करण्यात आली आहे. धनत्रयोदशीच्या शुभ दिनी 22 अक्टूबर को एसआरके फॅमिली टूरची सुरुवात झाली आहे.
एसआरके एक्सपोर्टकडून दरवर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर कर्मचाऱ्यांसाठी यात्रेचं आयोजन करण्यात येतं. या यात्रेचं नेतृत्व गोविंद ढोलकिया यांच्याकडून करण्यात येते. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची एकत्र यात्रा होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मित्रत्त्वाचं नातं अधिक दृढ होतं, अशी भावना ढोलकिया यांची आहे. या यात्रेत योगासन, गंगा समुह स्नान आणि भगवद्गगीता पारायणही करण्यात येतं. यासंह विविध खेळ, पतंजली आश्रमाची भेट, रक्तदान शिबीर, प्रेरणा शिबीर, दांडियासह अनेक सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात येतात. त्यामुळे, कर्मचाऱ्यांमधील बांधिलकी अधिक घट्ट होते.