काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत सत्रन्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आज राहुल गांधी स्वत: सुरत येथील सत्र न्यायालयात उपस्थित होते. मानहानीच्या खटल्यातील शिक्षेला आव्हान देण्यासाठी ते आले होते. या प्रकरणी त्यांनी शिक्षा सुनावल्यानंतर ११ दिवसांनी त्यांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. दरम्यान त्यांनी आज कोर्टात नियमित जामिनासाठी अर्जही दाखल केला होता.
राहुल गांधी आणि प्रियांका गांधीही सुरतमध्ये उपस्थिती होते. काँग्रेसचे अनेक दिग्गज नेतेही त्यांच्यासोबत सुरतमध्ये उपस्थित होते.
जगातील सर्वात लोकप्रिय नेते बनले पंतप्रधान मोदी, अमेरिकेच्या बायडन यांनाही खूप मागे टाकलं!
मानहानीच्या खटल्यात कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात राहुल गांधी यांनी अपील दाखल केले होते. या अर्जावर त्यांना १३ एप्रिलपर्यंत जामीन मिळाला आहे. त्याचबरोबर या प्रकरणी पुढील सुनावणीची तारीख ३ मे निश्चित करण्यात आली आहे. यासोबतच न्यायालयाने राहुल गांधींना नियमित जामीनही मंजूर केला आहे. राहुल गांधींच्या वतीने त्यांच्या वकिलांनी सुरत न्यायालयात कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारा अर्ज दाखल केला होता. दुपारी तीनच्या सुमारास राहुल गांधी न्यायालयात हजर झाले. यावेळी त्यांच्यासोबत वकिलांच्या टीमसह तीन राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते. राहुल गांधींसोबत प्रियांका गांधीही सुरतमध्ये आल्या होत्या. आणि काँग्रेस नेत्यांना न्यायालयाबाहेरच रोखण्यात आले. दुसरीकडे, न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर राहुल गांधी आजच दिल्लीत परतत आहेत.
२०१९ मध्ये राहुल गांधींनी केलेल्या 'मोदी आडनाव'च्या विधानासाठी न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. याला अपील करण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली होती. आदेशानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती न दिल्यास त्यांना आठ वर्षे निवडणूक लढवता येणार नाही. सुरतच्या सीजेएम न्यायालयाच्या निर्णयाला राहुल गांधी यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. राहुल गांधींच्या वतीने अपील दाखल करण्यापूर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सुरतमध्ये पत्रकार परिषद घेतली. यामध्ये गेहलोत यांनी भाजपवर केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप केला.