सत्ताधार्यांकडून व्यापार्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरेश भोळे: मुख्यमंत्री, महसूल मंत्र्यांशी चर्चा करून न्याय मिळवून देऊ
By admin | Published: February 04, 2016 12:06 AM
जळगाव : महापालिकेतील सत्ताधारी गटाकडून केवळ व्यापार्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका करीत १३५ क्रमांकाचा ठराव पुन्हा जिवंत होऊ शकतो. त्यासाठी शासनाची मदत लागल्यास आपण सहकार्य करू. मुख्यमंत्री, महसूलमंत्र्यांशी चर्चा करून न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन आमदार सुरेश भोळे यांनी बुधवारी गाळेधारकांच्या मोर्चास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संबोधीत करताना दिले.
जळगाव : महापालिकेतील सत्ताधारी गटाकडून केवळ व्यापार्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका करीत १३५ क्रमांकाचा ठराव पुन्हा जिवंत होऊ शकतो. त्यासाठी शासनाची मदत लागल्यास आपण सहकार्य करू. मुख्यमंत्री, महसूलमंत्र्यांशी चर्चा करून न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन आमदार सुरेश भोळे यांनी बुधवारी गाळेधारकांच्या मोर्चास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संबोधीत करताना दिले.जिल्हाधिकारी कार्यालयावर मनपाच्या १४ व्यापारी संकलातील गाळेधारक व्यापार्यांचा मोर्चा आल्यानंतर तेथे सभा झाली. यावेळी भोळे बोलत होते. ते पुढे म्हणाले, याप्रश्नी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. महापालिकेच्या इतिहासात आतापर्यंत लिलावाची पद्धत अवलंबली गेली नाही. महासभांमध्ये गाळेप्रश्नी चर्चा झाल्या, मात्र नोंदी वेगळ्याच असत. त्यामुळे अन्यायाचीच भूमिका या मंडळींची आहे. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत एकत्र रहा. व्यापारी सेवा देण्याचे काम करतात त्यांना त्रास देऊ नका. समन्वयातून मार्ग काढावा अशी आपण सत्ताधार्यांना विनंती करू. उत्पन्न वाढीसाठी मनपासमोर अनेक पर्याय आहेत. १७ मजलीतील काही मजले भाड्याने द्या, पडून असलेल्या जागा विका. हेे न करता स्वत:चे पाप दुसर्याच्या माथी मारण्याचा प्रयत्न ही मंडळी करत आहे. गरीब जिवांशी खेळू नका असे सांगून १३५ क्रमांकाचा ठराव पुन्हा जिवंत होऊ शकतो. त्यासाठी शासनाची मदत लागल्यास आपण सहकार्य करू असे आश्वासन दिले. ठरावास मान्यता न दिल्यास अंगाशी येईल, असे सांगून नगरसेवकांनाही या मंडळी घाबरवत असल्याचे त्यांनी सांगून याप्रश्नी एकीने रहा असे व्यापार्यांना सांगितले. हा व्यापार्यांवर अन्यायलिलावाचा ठराव म्हणजे व्यापार्यांवर अन्याय असल्याचे कोअर कमेटीचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांवेळी म्हणाले. एकदा काही गाळेधारकांच्या घरात डोकावून बघा. दिवसाला दिडशे ते दोनशे उत्पन्न मिळविणारा लिलावात भाग घेऊ शकेल काय? असा सवाल करून हा सर्व संकुलातील व्यापार्यांचा हा लढा असल्याने सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. मनपाचे नुकसान न होता ९९ वर्षांच्या कराराचा विचार करावा असेही त्यांनी सांगितले.