शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

युद्धाचं सावट! भारताकडून 2700 कोटींच्या शस्त्रास्त्रे खरेदीला तातडीची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 2:51 PM

संरक्षण खरेदी परिषदे(डीएसी)नं बुधवारी 2700 कोटी रुपयांच्या शस्त्र खरेदीला मंजुरी दिली आहे.

नवी दिल्ली- संरक्षण खरेदी परिषदे(डीएसी)नं बुधवारी 2700 कोटी रुपयांच्या शस्त्र खरेदीला मंजुरी दिली आहे. संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेची एक बैठक झाली. या बैठकीत डीएसीनं संरक्षण सामग्री खरेदी करण्याच्या निर्णयाला तातडीनं मान्यता दिली आहे. त्याअंतर्गत भारतीय नौसेनेसाठी तीन कॅडेट प्रशिक्षण युद्धनौका खरेदी करण्यात येणार आहेत.या युद्धनौकेच्या माध्यमातून महिला अधिकाऱ्यांसह कॅडेट अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहे. ही युद्धनौका चिकित्सा सेवा, मनुष्य सहाय्यता आणि आपत्कालीन मदत देण्यासाठी सक्षम आहे. तसेच युद्धनौकेद्वारे याशिवाय बचावकार्य आणि सर्च ऑपरेशन राबवता येणार आहे. राजस्थानातल्या गंगानगर जिल्ह्याला लागून असलेल्या पाकिस्तानमधील सीमारेषेत पाकिस्ताननं सैन्यबळ वाढवलं आहे. तसेच बीकानेरच्या जवळपासच्या भागातील सैन्याच्या हालचाली तीव्र झाल्या आहेत. पाकिस्ताननं सिंध भागातील तीन मोठ्या एअरबेसवरून लढाऊ विमानांची उड्डाणं वाढवली आहेत. ज्यात कराचीहून जेएफ 17 थंडर, शाहबाजमधून एफ 16 आणि न्यू छोर एअरबेसमधून एफ 16सारख्या लढाऊ विमानांनी भरारी घेतली आहे. पाकिस्तानातील नियंत्रण रेषेतील 10 किलोमीटर आतपर्यंत हवाई क्षेत्रात लढाऊ विमानं सराव करत आहेत. तसेच बहावलपूरमधील पाकिस्तानी सैन्याच्या 31 कोरच्या इन्फ्रंट्री, मॅकेनाइज्ड व आर्म्ड फोर्सेसचीही ये-जा वाढली आहे. नियंत्रण रेषेवरही वातावरण शांत आहे.पाकिस्तानी सेनेच्या 31 कोरजवळ राजस्थान आणि पंजाब भाग आहे.  बीकानेर क्षेत्रातील बहावलपूर आणि जैसलमेरपासून जवळच असलेल्या पाकिस्तानच्या सीमा रेषेमध्येही सैन्याच्या हालचाली वाढल्या आहेत. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात येत आहे. सीमा सुरक्षा दलानं हाय अलर्ट दिला असून, नियंत्रण रेषेवर लष्कर वाढवण्यात आलं आहे. भारतीय नियंत्रण रेषेवर हेरगिरीसाठी ड्रोन आणि यूएव्ही उडवले जात आहेत. कालच भारतानं कच्छच्या क्षेत्रात पाकिस्तानचे ड्रोन पाडले होते. भारतीय गुप्तचर यंत्रणांचीही परिस्थितीवर नजर आहे. समुद्री सीमेतील बंदरगा, नवलखी आणि पायक्रिकसह पूर्ण क्षेत्रात हाय अलर्ट दिलं आहे. सीमवर्ती भागात जवान तैनात करण्यात आले आहेत. 

उत्तर भारतात अलर्ट! लेह, जम्मू, श्रीनगर, पठाणकोट आणि चंदीगड विमानतळ बंद 

भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असून, भारताने दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानने आज सकाळी हवाई हद्दीचे उल्लंघन करून हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यामुळे संपूर्ण उत्तर भारतात दक्षतेचे आदेश देण्यात आले असून, लेह, जम्मू, श्रीनगर, पठाणकोट आणि चंदीगड विमानतळ सर्वसामान्य प्रवाशांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian navyभारतीय नौदलsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकPakistanपाकिस्तान