ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय केंद्रिय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दिलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ट्रेनिंगमुळेच मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्जिकल स्ट्राईकसारखा मोठा निर्णय घेऊ शकलो असं ते म्हणाले आहेत. या विधानानंतर विरोधी पक्षाकडून पर्रिकरांवर टीका होत आहे.
सोमवारी गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका कार्यक्रमात बोलताना पार्रिकर यांनी सर्जिकल स्ट्राइकचं श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) ट्रेनिंगला दिलं. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी हे महात्मा गांधींच्या भूमीतून आले आहेत तर मी स्वतः मार्शल रेसचं राज्य गोव्यातून आलो आहे, या सर्वस्वी वेगळ्या समीकरणानंतरही संघाच्या ट्रेनिंगमुळेच सर्जिकल स्ट्राईकसारखा महत्वाचा निर्णय आम्ही घेऊ शकलो.
पुरावे देऊनही काही लोकांचे समाधान होणार नाही असं म्हणत सर्जिकल स्ट्राईकबाबत पुरावे मागणा-यांना पर्रिकरांनी यावेळी उत्तर दिलं .