शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

2016च्या सर्जिकल स्ट्राईकचे हिरो म्हणतात, आधीही झाल्या 'अशा' धाडसी कारवाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 07:30 IST

लष्कराच्या राजकीय वापराबद्दल निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांच्याकडून नाराजी व्यक्त

जयपूर: लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपाकडूनसर्जिकल स्ट्राइकवरुन दावे प्रतिदावे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर 2016 मध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांनी भाष्य केलं आहे. लष्करानं आधीही सीमा ओलांडून सर्जिकल स्ट्राइक केल्याचं हुडा यांनी म्हटलं. यूपीए सरकारच्या काळात सहा सर्जिकल स्ट्राइक झाल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. त्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला हुडा यांनी उत्तर दिलं. 'भारतीय लष्करानं याआधीही सीमा ओलांडून कारवाया केल्या आहेत. मात्र त्या नेमक्या कुठे आणि कधी केल्या याची मला कल्पना नाही,' असं हुडा यांनी जयपूरमध्ये पत्रकारांना सांगितलं. लष्कराच्या कामाचं राजकारण करणं अयोग्य असल्याचंदेखील ते पुढे म्हणाले. 'निवडणुकीच्या प्रचारात लष्कराला आणणं योग्य नाही. निवडणूक आयोगानंदेखील तशा सूचना दिलेल्या आहेत. राजकीय पक्षांकडून निवडणूक प्रचारात लष्कराच्या कामगिरीचा वापर होणं दुर्दैवी आहे. दीर्घकालीन परिस्थितीचा विचार केल्यास याचे लष्करावर प्रतिकूल परिणाम होतात,' असं हुडा यांनी म्हटलं. भारतीय लष्करानं उरीत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी केलेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये हुडा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या निवडणूक प्रचाराच्या भाषणांमध्ये अनेकदा राष्ट्रीय सुरक्षा आणि सर्जिकल स्ट्राइकचा उल्लेख करत आहेत. मोदींच्या या भाषणांवर काँग्रेसकडून टीका होत आहे. गेल्याच आठवड्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी यावर भाष्य करताना मोदींवर शरसंधान साधलं. यूपीए सरकारच्या काळातही सर्जिकल स्ट्राइक झाले. मात्र लष्करानं केलेल्या कारवायांचा आम्ही कधीही मतांसाठी वापर केला नाही, असं सिंग म्हणाले. यानंतर काँग्रेसनं पत्रकार परिषद घेऊन यूपीए सरकारच्या काळात सहा सर्जिकल स्ट्राइक झाल्याचा दावा केला. काँग्रेसनं ठिकाणं आणि तारखांसह सर्जिकल स्ट्राइक्सची माहिती पत्रकारांना दिली. यावरुन केंद्रीय मंत्री अरुण जेटलींनी काँग्रेसवर निशाणा साधला. यूपीए सरकारनं केलेले सर्जिकल स्ट्राइक अदृश्य होते, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसला टोला लगावला.  

टॅग्स :surgical strikeसर्जिकल स्ट्राइकcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकIndian Armyभारतीय जवान