शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीरमधील चिनाब ब्रिजवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी, पाकिस्तानबरोबर चीनही रचतोय कट
2
हीच ती वेळ? शिंदे गटातील नेते ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांची भेटीला; अचूक टायमिंगची चर्चा
3
IND vs NZ, 3rd Test : जड्डूचा 'पंजा' अन् वॉशिंग्टनचा 'चौका'; न्यूझीलंडचा पहिला डाव २३५ धावांत आटोपला
4
Maharashtra Election 2024: गुलाबराव विरुद्ध गुलाबराव; मंत्री बनवणाऱ्या 'या' मतदारसंघात चुरशीची लढत
5
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
6
“बंडखोरी केलेले लोक आमचेच, समजूत काढण्यात यश येईल”; देवेंद्र फडणवीसांना विश्वास
7
Singham Again Movie Review : रामायणाच्या पटलावरील अ‍ॅक्शन-कॉमेडीचा फसलेला डाव, जाणून घ्या कसा आहे सिनेमा?
8
WhatsApp ने आणलं कस्टम चॅट लिस्ट फीचर; युजर्सचा होणार मोठा फायदा, कसा करायचा वापर?
9
Gold Silver Price Review: सोन्यापेक्षा चांदीत अधिक तेजी; ऑक्टोबरमध्ये ₹४३६० महागलं गोल्ड, तर चांदी...
10
मराठा आंदोलकांच्या घोषणाबाजीने भाजपा उमेदवार मेघना बोर्डीकरांचा गावातून काढता पाय
11
"...तोवर कायदा लागू केला जाऊ शकत नाही", UCC संदर्भात प्रशांत किशोर यांचा मोदी सरकारला सल्ला
12
आज मुहूर्त ट्रेडिंगवर खरेदी करा 'हे' 10 शेअर्स...तज्ज्ञांना दमदार परताव्याची आशा
13
चेन्नईनं १८ कोटी का मोजले? Ravindra Jadeja नं मुंबईच्या मैदानात दिलं उत्तर
14
शौर्य, धैर्य अन् प्रेमाचा संगीतमय नजराणा! दिवाळीच्या मुहुर्तावर 'संगीत मानापमान'चा टीझर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
15
Diwali Padwa 2024: दिवाळी पाडव्याला बायकोने नवर्‍याचे औक्षण करण्यामागे आहे एक लोभस कथा!
16
अबू आझमींच्या अडचणी वाढणार?; सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार; प्रकरण काय?
17
"इंपोर्टेड माल", अरविंद सावंत यांनी आक्षेपार्ह शब्द वापल्याचा शायना एनसींचा आरोप, सावंत म्हणाले...
18
अग्निकल्लोळ! देवघरातील दिव्यामुळे लागली भीषण आग; दिवाळीच्या दिवशी ३ जणांचा मृत्यू
19
५०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत BSNL चा प्लॅन; दीर्घ वैधतेसह मिळणार एक्स्ट्रा डेटा
20
शरद पवार गटाचे उमेदवार समरजित घाटगे अंतरवालीत; मनोज जरांगेंची घेतली भेट, २ तास चर्चा

आश्चर्य ! "या" गावात सर्वांचाच जन्म 1 जानेवारीचा

By admin | Published: May 20, 2017 11:14 AM

अलाहाबादमध्ये असलेल्या या गावात प्रत्येकाचीच जन्मतारीख 1 जानेवारी आहे

ऑनलाइन लोकमत
अलाहाबाद, दि. 20 - एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 1 जानेवारी असेल तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. पण जर त्याचे आई, वडिल, भावंडं इतकंच नाही तर संपुर्ण खानदानाची जन्मतारीख 1 जानेवारी असेल तर...ऐकतानाचा चित्रिविचित्र वाटत असलेल्या या गोष्टीवर विश्वास ठेवणं शक्य तरी आहे का ? पण विश्वास बसत नसला तरी उत्तरप्रदेशातील गावात मात्र असं घडलं आहे. अलाहाबादमध्ये असलेल्या या गावात प्रत्येकाचीच जन्मतारीख 1 जानेवारी आहे. 
 
अलाबादमधील गुरपूर ब्लॉक येथील कजंसा गावातील ही परिस्थिती आहे. या गावातील प्रत्येकाचीच जन्मतारीख 1 जानेवारी असून आधार कार्डवर तशी नोंदच आहे. 
 
10 हजार लोकसंख्या असलेल्या या गावाला आधार कार्डसाठी खूप वाट पाहावी लागली. ही घोडचूक तेव्हा लक्षात आली जेव्हा सरकारी प्राथमिक शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंद करण्यासाठी गावात पोहोचले. उत्तर प्रदेश सरकारने शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांची संख्या माहिती करुन घेण्यासाठी त्यांचे आधार क्रमांक नोंद करण्याचा आदेश दिला आहे.  कोणत्याही घरात गेले असता प्रत्येकाची जन्मतारीख एकच असल्याचं पाहून ही चूक शिक्षकांच्या लक्षात आली. त्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं. 
 
चूक लक्षात आल्यानंतर गावक-यांना पुन्हा नव्याने आधार कार्ड देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.