नितीन अग्रवाललाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : गोदामांमध्ये चोरी व अन्नधान्याचे नुकसान होणे ही बाब आता जुनी झाली आहे. आता गोदामांत गव्हाची शेती झाल्यासारखे वाटत आहे. कारण सरकारी आकडेवारीनुसार, ७,७०९ टन गव्हाच्या नुकसानीशिवाय या गोदामांत गहू १०.५ लाख टनांनी वाढला आहे. यातील सर्वाधिक गहू पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थानच्या गोदामात वाढला आहे.
अन्न व पुरवठा मंत्रालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, मागील पाच वर्षांत देशभरातील गोदामांमध्ये गव्हाची १०,४९,७०० लाख टनांनी वाढ झाली. यातील सर्वाधिक ४.०९ लाख टनाची वाढ पंजाब व ३.०६ लाख टनाची वाढ हरियाणात झाली. महाराष्ट्रासह ६ राज्यांच्या गोदामांतील गहू कमीही झाला आहे. यात सर्वाधिक ७,१५५ टन गहू महाराष्ट्रात, २४८ टन गहू ओडिशात, २२२ टन गहू दिल्लीत गोदामांतून कमी झाला.
राज्य वाढलेला गहूपंजाब ४,०९,३३०हरियाणा ३,०६,१२०मध्य प्रदेश १,५१,२२८उत्तर प्रदेश १,०५,५६४राजस्थान ६०,१५०गुजरात ९,४१२
राज्य वाढलेला गहूकेरळ ४,६८६पश्चिम बंगाल ४,३४१तामिळनाडू १,८८४महाराष्ट्र (कमी) ७१५५अखिल भारतीय १०,४९,७००सर्व आकडेवारी टनमध्ये