पाकिस्तान : दहशतवाद्यांचे आश्रयस्थान - पवन देशपांडे, मुंबईभारत आमच्या भूमीत घुसून हल्ले करत असल्याचा आणि वेळोवेळी शस्त्रसंधीचे उलंघन करत असल्याचा कांगावा पाकिस्तान सातत्याने करत आला आहे. परंतु, पाकिस्तानच दहशतवाद्याचे आश्रयस्थान आणि दहशतवाद्यांना पोसणारा देश असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. त्यातील अनेक संघटना भारतावर सातत्याने हल्ले करत आल्या आहेत. या संघटनांबद्दल खास रिपोर्ट...मुशर्रफ यांची ही कबुली पाहा...‘‘आम्ही लष्कर ए तय्यबासारख्या दहशतवादी संघटनेला आणि त्यांच्या सदस्यांना सहाय्य करत होतो’’, अशी कबुली पाकिस्तानचे माजी राष्ट्रप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनीच २०१५ सालच्या आॅक्टोबर महिन्यात दुनिया न्यूज या पाकिस्तानी चॅनेलच्या मुलाखतीत दिली होती़ ते म्हणाले होते की, ‘‘१९९० च्या दहशकात काश्मीरमध्ये स्वातंत्र्याच्या भावना उफाळल्या होत्या़ त्याचेवेळी लष्कर ए तय्यबासह ११ ते १२ दहशतवादी संघटना तयार झाल्या व आम्ही त्यांना सहकार्य केले़ त्यांना प्रशिक्षण दिले. कारण ते काश्मीरसाठी लढणार होते़’’ या कबुलीवरूनच जगाला पाक कसा अतिरेकीस्तान बनला याचा स्पष्ट पुरावा मिळू शकतो़ हक्कानी नेटवर्कला साहाय्यपाकची आयएसआय ही गुप्तहेर संघटना हक्कानी नेटवर्क या अफगाणी बंडखोरांच्या संघटनेला कायम सहाय्य करत असल्याचा आरोप अमेरिकेने सातत्याने पाकिस्तानवर लावला आहे़ शिवाय कारणावरून पाकला दिली जाणारी मदत थांबविण्याच्या धमक्या अमेरिका देत आहे़या हक्कानी नेटवर्कने कायमच अफगाणमधील अमेरिकी सैनिकांवर हल्ले केले आहेत आणि त्याच संघटनेला पाकने मदत करू नये असा अमेरिकेचा आग्रह राहिला आहे. तीन दशकांपासून पाकिस्तानात दहशतवादी संघटना वाढत आहेत1980 च्या दशकात हुजी, हरकत उल मुजाहिद्दीन, हरकत उल मुजाहिद्दीन (एचएम) या तीन संघटना पाकमध्ये उदयास आल्या. 1990च्या दशकात लष्कर ए तय्यबा, जमैत उल मुजाहिद्दीन, मुताहिदा जेहाद कॉन्सिल, अल बद्र, तेहरिक उल मुजाहिद्दीन या संघटना सुरू झाल्या होत्या़ 2000च्या दशकात जैश ए मोहम्मद व लष्कर ए जब्बार या दोन संघटना सुरू झाल्या. - दहशतवादी हल्ले1821 दहशतवादी हल्ले २०१४ साली पाकमधील संघटनांनी तिथेच केले आहेत.1760 लोकांचा बळी या हल्ल्यांमध्ये गेला आहे. 2836 लोक गंभीर जखमी झाले होते. 535 शहरे किंवा ठिकाण पाकिस्तानात अशी आहेत जिथे एका वर्षात एकदा तरी दहशतवादी हल्ला झाला आहे.- 374 जणांचा मृत्यू कराची या एकट्या शहरात झालेल्या विविध दहशतवादी हल्ल्यांमध्ये झाला आहे. - 100 अब्ज डॉलर एवढा खर्च पाकला दहशतवादी संघटनांवर वचक ठेवण्यासाठी आला आहे आणि विशेष म्हणजे एवढे त्यांचे शैक्षणिक बजेटही नाही.40 दहशतवादी संघटना पाकिस्तानात सध्या आश्रयास आहेत. त्यापैकी १२ संघटना या मूळ पाकमध्येच उदयास आलेल्या आहेत. - जागतिक दहशतवाद निर्देशांकात पाकिस्तान चौथ्या स्थानी आहे.
अतिरेकीस्तान !
By admin | Published: October 09, 2016 5:24 AM