नवी दिल्ली : काल म्हणजेच 7 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदीसरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. त्यापूर्वी, मंत्रिमंडळातून आरोग्य मंत्री, शिक्षण मंत्री, सूचना आणि प्रसारण मंत्र्यांसह 12 मंत्र्यांना डच्चू देण्यात आला. तर, 36 नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली. दरम्यान, या मंत्रिमंडळ विस्तारावर लोकल सर्कल या वेबसाइटने एक सर्व्हे केला आहे. त्या सर्व्हेनुसार, मंत्रिमंडळ विस्तारामुळे कामात सुधारणा होईल, अशी फक्त 4 लोकांना आशा आहे.
सर्व्हेत काय विचारण्यात आले ?
लोकल सर्कलने सांगितल्यानुसार, सर्वेक्षणादरम्यान देशातील 309 जिल्ह्यात राहणाऱ्या नागरिकांकडून 9,618 प्रतिक्रिया मिळाल्या. यात 68 टक्के पुरुष आणि 32 महिला होत्या. सर्वेक्षण लोकलसर्कल प्लॅटफॉर्मवरुन करण्यात आले. सर्वेक्षणानुसार 53 टक्के लोकांना वाटतं की, प्रशासनात सुधारणा आणण्यासाठी, उद्देश ठरवणे आणि मंत्र्यांची कामगिरी मोजण्यासाठी एका मजबूत यंत्रणेची आवश्यकता आहे. सर्व्हेत विचारले की, 'मोदी सरकारला प्रशासनात सुधारणा करणे आणि निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची गरज आहे ?''
या प्रश्नावर 2 टक्के लोक म्हणाले- जास्त मंत्री असल्यामुळे कामात सुधारणा होईल. 2 टक्के म्हणाले- नोकरशाही असल्याने अधिक चांगले प्रशासन मिळेल. 2 टक्के म्हणाले- मंत्री आणि नोकरशाही असल्यास चांगले प्रशासन मिळेल. 12 टक्के म्हणाले- खासगी क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याची गरज. 19 टक्के लोकांचे मानने आहे की, चांगल्या प्रशासनासाठी सरकारला अजून चांगले निर्णय घ्यावे लागतील. 5 टक्के लोकांनी आपले मत मांडले नाही तर 5 टक्के लोकांनी चांगले प्रशासन संभव नसल्याचे म्हटले. याशिवाय, 53 टक्के लोकांनी प्रशासनात सुधारणा आणण्यासाठी स्पष्ट उद्देश ठरवणे आणि मंत्र्यांच्या कामाचे मोजमाप करण्यासाठी एका मजबूत यंत्रणेची गरज असल्याचे म्हटले आहे.