सर्व्हे : बंगालमध्ये 'दीदीं'ची हॅट्रिक, आसाममध्ये भाजप पुन्हा सत्तेत; जाणून घ्या, कुठे कुणाचं येणार सरकार

By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 27, 2021 11:23 PM2021-02-27T23:23:21+5:302021-02-27T23:26:12+5:30

पश्चिम बंगाल (West Bengal), आसाम (Assam), केरळ (Kerala ), तामिळनाडू (Tamil Nadu) आणि पुदुच्चेरी (Puducherry) या ठिकाणी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, नेमके कोठे कुणाची सत्ता येऊ शकते, हे जाणण्याचा प्रयत्न करतण्यात आला आहे.

Survey: Didin's hat-trick in Bengal, BJP back in power in Assam; Find out where the government will come from | सर्व्हे : बंगालमध्ये 'दीदीं'ची हॅट्रिक, आसाममध्ये भाजप पुन्हा सत्तेत; जाणून घ्या, कुठे कुणाचं येणार सरकार

सर्व्हे : बंगालमध्ये 'दीदीं'ची हॅट्रिक, आसाममध्ये भाजप पुन्हा सत्तेत; जाणून घ्या, कुठे कुणाचं येणार सरकार

Next

नवी दिल्ली - बंगालसह 4 राज्ये आणि एका केंद्र शासित प्रदेशासाठी विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर झाली आहे. आता सर्वजण 2 मेकडे डोळे लावून बसले आहेत. कारण 2 मेरोजीच मतमोजणी होणार आहे. निवडणूक तारखांच्या घोषणेबरोबरच आचार संहिताही लागू झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षही मतदारांना अमिषं देत आहेत. (C voter opinion poll survey who will win in Bengal Assam Tamilnadu Kerala assembly election BJP TMC) 

पश्चिम बंगाल (West Bengal), आसाम (Assam), केरळ (Kerala ), तामिळनाडू (Tamil Nadu) आणि पुदुच्चेरी (Puducherry) या ठिकाणी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, एबीपी न्यूज आणि सी-व्होटर ओपिनियन पोलच्या माध्यमाने, नेमके कोठे कुणाची सत्ता येऊ शकते, हे जाणण्याचा प्रयत्न करतण्यात आला आहे.  

"बंगाल को अपनी बेटी चाहिए, बुआ नहीं", 'ते' पोस्टर ट्विट करत भाजपाचा ममता बॅनर्जींना सणसणीत टोला

पश्चिम बंगालच्या बाबतीत काय सांगतो ओपिनियन पोल? - 
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील टीएमसी पुन्हा एकदा सत्तेवर येताना दिसत आहे. ओपिनियन पोल नुसार, टीएमसीला 148-164 मिळू शकतात. त 200 हून अधिक जागा मिळतील, असा दावा करणाऱ्या भाजपला 92 ते 108 जागांवरच समाधानी रहावे लागू शकते. या सर्व्हेनुसार, काँग्रेस आणि लेफ्ट आघाडीच्या पारड्यात 31-39 जागा येण्याची शक्यता आहे.

बंगालमध्ये एकूण 294 विधानसभा जागांवरील मतदानाच्या टक्केवारीचा विचार करता, टीएमसीला 43% तर भाजपला 38% मते मिळू शकतात. तर काँग्रेस-लेफ्ट आघाडीला केवळ 13% मते मिळण्याची शक्यता आहे. बंगालमध्ये 2016मध्ये झालेल्या निवडणुकीत टीएमसीला 211, काँग्रेस-लेफ्टला 76, तर भाजपला केवळ 3 आणि इतरांना 2 जागा मिळाल्या होत्या.

पश्चिम बंगाल निवडणूक: काल सीएम ममता तर आज स्मृती ईरानी दिसल्या स्कूटरवर, असा होता अंदाज

आसाममध्ये पुन्हा भाजप सरकार? 
ओपिनियन पोलनुसार, आसाममध्ये भाजप आघाडीच्या खात्यात 42% मते जाताना दिसत आहेत. तर काँग्रेस आघाडीला 31% मते मिळू शकतात. याच बरोबर इतरांच्या खात्यात 27 टक्के मते जाण्याची शक्यता आहे.

पोल नुसार, 126 सदस्य संख्या असलेल्या या विधानसभेत भाजप आघाडीला 68 ते 76 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर काँग्रेस आघाडीला 43 ते 51 जागा मिळण्याची शक्यता आहे. आसाममध्ये सत्ता स्थापण करण्यासाठी 64 ही मॅजिकल फिगर आहे. 

मोदी-शहांच्या दौऱ्यांना अनुसरुन निवडणुकांच्या तारखा, ममतांचा आयोगावर प्रहार 

पदुच्चेरीत एनडीएचं सरकार!
ओपिनियन पोलनुसार, 30जागा असलेल्या पुदुच्चेरी विधानसभेत एनडीएला 46 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस आघाडीला 36 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. जागांचा विचार करता एनडीएला 17 ते 21 जागा तर काँग्रेस आघाडीला 8 ते 12 जागा मिळू शकतात.

केरळमध्ये पुन्हा कम्युनिस्ट सरकार!
ओपिनियन पोलनुसार, केरळमध्ये सीपीआय (एम) च्या नेतृत्वाखालील लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट (एलडीएफ)ला यावेळी 83-91 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (यूडीएफ)ला 47 ते 55 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला येथे केवळ 0 ते 2 जागाच मिळू शकतात.

Assembly Elections 2021: पश्चिम बंगालसह 5 राज्यांत निवडणुका जाहीर, केवळ 5 लोकच घरो-घरी जाऊन करू शकणार प्रचार

तमिळनाडू डीएमके? -
ओपिनियन पोलनुसार, तमिळनाडूत एआयएडीएमके आघाडीला 29 टक्के, तर डीएमके आघाडीला जवळपास 41 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना 30 टक्के मते मुळू शकतात. जागांचा विचार करता एआयएडीएमके आघाडीला 58 ते 66 जागा मिळण्याची शक्यता आहे. येथे डीएमके आघाडी सत्तेत येताना दिसत आहे. डीएमके आघाडीला 154 ते 162 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांच्या खात्यात केवळ 8 जागाच जाऊ शकतात.

Web Title: Survey: Didin's hat-trick in Bengal, BJP back in power in Assam; Find out where the government will come from

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.