पुणे - सन २०२२ मधील अखेरचं खंडग्रास सूर्यग्रहण लागलं आहे. या ग्रहण काळात अनेक मंदिरे बंद ठेवण्यात आली आहे. शिर्डीतील साईबाबा, पुण्यातील दगडूशेठ गणपती, तिरुपती, केदारनाथ, वाराणसी, अक्कलकोटमधील स्वामी समर्थ यासह अनेक मंदिरे बंद ठेवण्यात आली आहे. भारतात नवी दिल्ली, बंगळुरू, कोलकाता, चेन्नई, उज्जैन, वाराणसी, मथुरा याठिकाणी ग्रहण दिसणार आहे.
भारतात अमृतसर येथे पहिल्यांदा खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळालं. सूर्याचा ४० ते ५० टक्के भाग ग्रहणात व्यापला जाणार आहे. देशभरातील प्रमुख शहरांत खंडग्रास सूर्यग्रहणाला सुरुवात झाली आहे. ४.२९ मिनिटांनी भारतात खंडग्रास सूर्यग्रहणाला सुरुवात झाली. सूर्यग्रहण पाहताना काळजी घ्यावी असं आवाहन खगोलप्रेमींनी केले आहे. पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर पांढरा पडदा टाकण्यात आला आहे. त्यामुळे दर्शनासाठी मंदिर बंद राहील. औरंगाबाद येथे डोंगरावर खगोलप्रेमी जमले असून त्याठिकाणाहून ते सूर्यग्रहण पाहणार आहेत.
सूर्यग्रहणात काय करावं काय नाही?या काळात वृद्ध, गरोदर महिला आणि लहान मुले वगळता सर्वांनी झोपणे, खाणे पिणे टाळावे. संपूर्ण ग्रहण काळात गर्भवती महिलांनी विशेषत: एकाच जागी बसावे. तुम्ही बसून हनुमान चालीसा वगैरे पाठ करू शकता. त्यातून होणारा ग्रहणाचा प्रभाव त्यांच्यावर कुचकामी राहील.
आकाशातील ही खगोलीय घटना उघड्या डोळ्यांनी कधीही पाहू नये कारण सूर्याच्या किरणांमुळे डोळ्यांना इजा होऊ शकते. दुर्बिणीनेही सूर्यग्रहण पाहू नये. हे पाहण्यासाठी फक्त खास बनवलेला चष्मा वापरावा. ग्रहण काळात चाकू, धारदार वस्तू वापरू नका. या दरम्यान अन्न आणि पाण्याचे सेवन टाळावे. ग्रहण काळात स्नान आणि पूजा करू नका, ही कामे ग्रहण काळात शुभ मानली जात नाहीत.
सूर्यग्रहणाचा या राशींवर परिणाम होण्याची शक्यतावर्षातील या शेवटच्या सूर्यग्रहणाचा प्रभाव वेगवेगळ्या राशींवर राहील. मेष, वृषभ आणि मिथुन राशीच्या लोकांना सूर्यग्रहणाचा वाईट परिणाम पाहायला मिळेल. कर्क राशीचे लोक या काळात पैसा कमावतील. कन्या राशीच्या लोकांना या काळात नुकसान होऊ शकते. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी धनहानी होण्याची शक्यता आहे आणि धनु राशीच्या लोकांना या काळात लाभ होईल.