शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटातील आमदाराविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा; हजारोंची गर्दी, काय आहे प्रकरण?
2
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
3
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...
4
अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा
5
संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य
6
कधीकाळी 75-80 टक्के ख्रिश्चन लोकसंख्या असलेला लेबनॉन मुस्लिम देश कसा बनला? वाचा...
7
'खटाखट'नंतर आता 'धडाधड'ची एन्ट्री...; अंबालातून राहुल-प्रियांका यांचा हल्लाबोल, भाजपवर थेट निशाना
8
१२ दिवसांत हिजबुल्लाहचा गेम फिनिश..पेजर हल्ला ते बंकर स्फोटापर्यंत इस्त्रायलचा तांडव
9
ठरलं! मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार; म्हणाले, “१२ वाजता या, एकजूट अन् शक्ती दाखवा”
10
विधानसभेआधी धारावीकरांसाठी सरकारची मोठी भेट; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ३८ निर्णय
11
३०० विकेट्स अन् ३००० धावांच्या कॉम्बोसह जड्डूच्या नावे झाला जम्बो रेकॉर्ड
12
सीबीआयचे पुण्यासह देशात ३२ ठिकाणी छापे; तीन शहरातील २६ म्होरक्यांना अटक
13
फायद्याची गोष्ट! आधार कार्ड करता येऊ शकतं लॉक; जाणून घ्या, कसं काम करतं हे भन्नाट फीचर
14
रोहित पवारांनी CM शिंदेंना दाखवला जुना व्हिडीओ; "माझी चेष्टा केली तोवर ठीक होते पण..."
15
भाजपाची बंडखोरांवर कारवाई! माजी मंत्र्यासह 'या' नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
16
बारामतीच्या महाविद्यालयात विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून, दुचाकीला कट मारल्याचा 'बदला'
17
सलग २४ व्या दिवशी अपर सर्किट, ₹३३ चा 'हा' शेअर ₹२६०० पार; कोणी शेअर विकणारंच नाही
18
“शिंदेंनी सूरत, गुवाहाटी किंवा कामाख्या मंदिरासमोर दसरा मेळावा घ्यावा”; संजय राऊतांचा टोला
19
बांगलादेशचा डाव २३३ धावांत आटोपला; टीम इंडियाकडे 'वनडे स्टाईल'मध्ये कसोटी जिंकण्याची संधी
20
500 च्या नोटेवर अनुपम खेर यांचा फोटो, खुद्द अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ

'मुँह में राम, जेब में चंदा, चम्पत होगा अब ये बंदा।', राम मंदिर ट्रस्टमधील कथित घोटाळ्याबाबत माजी IAS अधिकाऱ्याचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 11:41 AM

ram mandir trust : सूर्य प्रताप सिंह अनेकदा केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशच्या योगी सरकारच्या धोरणांवर टीका करताना दिसतात.

नवी दिल्ली : माजी आयएएस अधिकारी सूर्य प्रताप सिंह यांनी राम मंदिरासाठी जमीन खरेदी प्रकरणातील कथित घोटाळ्याबाबत जोरदार टीका केली आहे. त्यांनी एकामागून एक ट्विट केले असून म्हटले आहे की, "भगवान श्री राम यांच्या नावावर कोट्यवधींचा घोटाळा चिंताजनक आहे, राम हे समाजातील सर्वात खालच्या स्तरावर उभे असलेल्या व्यक्तीच्या तारणकर्त्याचे नाव आहे. ट्रस्टचे एक विश्वस्त डीएम अयोध्या आणि इतर दोन आयएएस आहेत. ट्रस्टच्या सरचिटणीसकडील आर्थिक अधिकार जप्त करून, सर्व आर्थिक अधिकार दोन जबाबदार लोकांना एकत्रितपणे देण्यात यावेत." (surya pratap singh ias slam ram mandir ayodhya ram mandir trust scam donation in rams pocket this man fired soon former iass taunt on the scam in ram mandir trust said lost the trust)

याचबरोबर, सूर्य प्रताप सिंह म्हणाले, रामजन्मभूमीला मिळालेला 1-1 रुपया राम भक्तांचाच आहे, जे त्यांच्या रामाबद्दलच्या अटूट भक्तीचे प्रतीक आहेत. माझा केंद्र सरकारला असा सल्ला आहे की, या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून ट्रस्टशी संबंधित सर्व आर्थिक अधिकार यंत्रणेशी संबंधित जबाबदार लोकांना मिळेल, जे रामभक्तांना पूर्णपणे उत्तरदायी असतील. या माजी आयएएस अधिकाऱ्यांने आणखी एक टोला लगावत ट्वीट केले आहे. यामध्ये लिहिले की, ‘मुँह में राम, जेब में चंदा, चम्पत होगा अब ये बंदा।’ तसेच, पुढे म्हणाले, 'ट्रस्टने लाखो रामभक्तांचा विश्वास गमावला.'

दरम्यान, सूर्य प्रताप सिंह अनेकदा केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशच्या योगी सरकारच्या धोरणांवर टीका करताना दिसतात. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत उन्नावमधील गंगेमध्ये मृतदेह सोडण्याचा मुद्दा प्रमुखपणे उपस्थित केला होता. याप्रकरणी, यूपी पोलिसांनीही त्याच्याविरूद्ध एफआयआर नोंदविला होता आणि चौकशीसाठी बोलविले होते.

काय आहे संपूर्ण प्रकरण?राम मंदिर ट्रस्टवर मंदिरासाठी जमीन खरेदीत घोटाळ्याचा आरोप केला आहे. आम आदमी पार्टी आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन असा आरोप केला की,  जी जमीन केवळ 2 कोटी रुपयांना विकली गेली होती, ती जमीन 18.5 कोटीमध्ये विकत घेतले गेली. दुसरीकडे, राम मंदिर ट्रस्टचे सेक्रेटरी चंपत राय यांनी म्हटले आहे की, या आरोपांमुळे कोणतीही चिंता वाटत नाही. ते म्हणाले की, आमच्यावर महात्मा गांधी यांच्या हत्येचा आरोपही करण्यात आला होता. आम्हाला अशा गोष्टींची पर्वा नाही.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या