मुंबई - सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाच्या तपासाने आता पूर्णपणे राजकीय वळण घेतलं असून, या आत्महत्या प्रकरणावरून विविध राजकीय पक्षांचे नेते उलटसुलट विधाने करून या वादला रोज नवनवी वळणे देत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजिद मेमन यांनी सुशांतसिंह राजपूतबाबत केलेल्या एका ट्विटमुळे राष्ट्र्रवादी काँग्रेस अडचणीत आली आहे. सुशांतसिंह राजपूतला जिवंत असतानापेक्षा आता कैकपटीने प्रसिद्धी मिळत आहे, असे ट्विट माजिद मेमन यांनी केले होते. मात्र या ट्विटनंतर पक्षाला याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले आहे.माजिद मेमन यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला माध्यमांतून मिळत असलेल्या प्रसिद्धीबाबत आज दुपारी एक ट्विट केले. सुशांत सिंह राजपूत जिवंत असताना इतका प्रसिद्ध नव्हता, जितकी प्रसिद्धी त्याला मृत्यूनंतर मिळाली आहे. तसेच सध्या प्रसारमाध्यमांमध्ये त्याला इतकी प्रसिद्धी मिळत आहे तेवढी प्रसिद्धी आपल्या देशाचे पंतप्रधान आणि अमेरिकेच्या राष्ट्रपतींनासुद्धा मिळत नसावी, असे मेमन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता
वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती
टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश
पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी