नवी दिल्ली : सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआयने पूर्वीच एसआयटीची स्थापना केली होती. आता, मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर सीबीआयची नजर आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर, आता मुंबई पोलीस काही कायदेशीर पाऊल उचलते का, याची सीबीआय वाट पाहत आहे. यानंतर, सीबीआयने स्थापन केलेल्या एसआयटीचा चमू मुंबईला येणार आहे. मुंबईत आल्यानतंर हा चमू क्राईम सीन रिक्रिएट करेल आणि रिया चक्रवर्ती तसेच तिच्या कुटुंबीयांचीही चौकशी करेल. यावेळी एसआयटीसोबतच फॉरेंसिकचा चमूही असेल.
सुशांत सिंह केससंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातील काही महत्वाच्या गोष्टी -सुशांत सिंह प्रकरणावर दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे, की एका प्रतिभासंपन्न अभिनेत्याच्या मृत्यूचे सत्य सर्वांनाच जाणून घ्यायचे आहे. जेव्हा सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली, तेव्हा मुंबई पोलिसांनी एडीआर दाखल केला होती. शवविच्छेदनानंतर मुंबई पोलिसांनी हा गंभीर गुन्हा न मानता, याप्रकरणी एफआयआर दाखल केली नव्हती.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे, ''पाटणा एथे दाखल करण्यात आलेली एफआयआर अगदी बरोबर आहे आणि आम्ही आमच्या विशेष शक्तीअंतर्गत या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देत आहोत. आता या प्रकरणाचा संपूर्ण तपास सीबीआयच अरेल.''
14 जूनला फाशी घेतल्याच्या अवस्थेत आढळून आला होता सुशांत सिंह -सुशांत सिंह राजपूत 14 जूनला मुंबईतील आपल्या अपार्टमेंटमध्ये फाशी घेतल्याच्या अवस्थेत आढळून आला होता. यानंतर मुंबई पोलीस या प्रकरणाची चौकशी करत होते. सुशांत सिंहच्या वडिलांनी पाटणा येथे एफआयआर दाखल केली आहे. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे आणि धोका देण्यासंदर्भात आरोप करण्यात आले आहेत. या एफआयआरलाच रिया चक्रवर्तीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
काँग्रेस नेत्याचा सरकारला घरचा आहेर -यासंदर्भात, काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी एक ट्विट करत राज्यातील ठाकरे सरकारला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे, "सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास कुठे तरी कमी पडत होता. हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेचा मुद्दा बनवू नका, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करा. सुशांत सिंग राजपूत मृत्यू तपास सीबीआयकडे सोपवा. मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर कोणालाही संशय नाही. परंतु या प्रकरणाचा तपास कमी पडत होता. हे दिसूनही येत होते, त्याचे कारण सरकारला माहिती आहे, असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या -
CoronaVirus Vaccine : पाकिस्तान कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी तयार!
15 ऑगस्टला पंतप्रधान मोदींनी लडाखवरून सुनावलं; आता अशी आली चीनची प्रतिक्रिया
CoronaVirus News: लोकांना संक्रमित करण्यासाठी अमेरिका तयार करतोय नवा कोरोना व्हायरस!
CoronaVirusVaccine : रशियन कोरोना लसीची अमेरिकेने उडवली खिल्ली, म्हणाले - माकडा लायकही नाही!
CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस
CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर