नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी सध्या राजकारण सुरू आहे. यावरून राजकीय नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे. बिहारच्या अनेक मंत्र्यानंतर आता केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मुंबई पोलिसांचा तपास म्हणजे केवळ प्रसिद्ध मिळवण्यासाठी होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
मुंबई पोलीस बॉलिवूडमधल्या दिग्गजांचा तपास करत आहे. मात्र, हा तपास म्हणजे फक्त प्रसिद्धी मिळविण्यासाठी केला जात आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात साधा FIR सुद्धा दाखल केलेला नाही. तपास कुणाचा करत आहेत, हे सांगितले नाही. आता या प्रकरणाची पाटनामध्ये FIR दाखल केली आहे, असे आर. के. सिंह यांनी म्हटले आहे.
याचबरोबर, सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनीही महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच, या प्रकरणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि बॉलिवूडमधल्या माफियांच्या दबावाखाली आहेत, असा गंभीर आरोप सुशीलकुमार मोदी यांनी केला आहे.
दरम्यान, पाटण्याचे पोलीस अधिक्षक विनय तिवारी हे आता सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पोलीस पथकाचे नेतृत्व करणार आहेत. ते पाटण्याहून मुंबईला येणार असल्याची माहिती बिहार पोलिसांनी दिली आहे. तसेच, बिहार पोलिसांनी आता त्यांच्या तपासाचा मार्ग काहीसा बदलला आहे.
बिहार पोलीस सुशांतची माजी मॅनेजर दिशा सॅलियनच्या आत्महत्येचीही चौकशी करणार आहेत. सुशांत आणि दिशाच्या आत्महत्येचे कनेक्शन तपासण्याचे काम बिहार पोलिसांनी हाती घेतले आहे. बिहार पोलिसांनी दिशाचा शवविच्छेदन अहवाल मिळवला आहे. सुशांतने आत्महत्या करण्याच्या काही दिवसांपूर्वीच दिशाने आत्महत्या केली होती.
आणखी बातम्या....
चीनचा इरादा काय? लडाखच्या दिशेने तैनात केले आण्विक बॉम्बर
भारताविरोधात चीनचा नवा डाव, नेपाळला मोहरा बनवून 'या' प्रकल्पाच्या कामाला केली सुरुवात
Sushant Singh Rajput death case: "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बॉलिवूड माफियांच्या दबावाखाली"
दिग्गजांचे ट्विटर अकाउंट्स हॅक करणाऱ्या १७ वर्षीय मुलानं एका दिवसांत कमावले १ लाख डॉलर
Article 370: ...म्हणून 5 ऑगस्ट हा आमच्यासाठी ऐतिहासिक नव्हे, काळा दिवस; मुफ्तींच्या लेकीची टीका
लवकरच सात नवीन Bullet Trains सुरू होणार; कोणत्या शहरांमध्ये धावणार, जाणून घ्या...
CoronaVirus News : कोरोना व्हायरस पाण्यामुळे मरतो, रशियन शास्त्रज्ञांचा दावा