पाटणा: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात पाटण्यातील राजीव नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांतच्या वडिलांनी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीविरोधात एफआयआर दाखल केला आहे. रियानं प्रेमात सुशांतची फसवणूक केली. त्याच्याकडून पैसे काढून घेतले. त्याला आत्महत्येस प्रवृत्त केलं, असे गंभीर आरोप सुशांतच्या वडिलांनी रियावर केले आहेत. त्यानंतर पाटणा पोलिसांची पथक मुंबईत पोहोचलं आहे. रिया चक्रवर्तीविरोधात पाटण्याच्या राजीव नगर पोलीस ठाण्यात पाच पानी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर अतिशय गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. 'रियानं सुशांतला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं. त्याच्याकडून पैसे मिळवले. त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं,' असं सुशांतच्या वडिलांनी एफआयआरमध्ये म्हटलं आहे. पाटणा पोलिसांनी सुशांतच्या वडिलांनी केलेल्या आरोपावरून दाखल केलेल्या गुन्ह्याचा क्रमांक २४१/२० आहे. पोलिसांनी एफआयआरमध्ये आयपीसीच्या ४०६, ४२०, ३४१, ३२३ आणि ३४२ कलमांचा उल्लेख केला आहे. पाटणा पोलीस दलातील चार जण मुंबईत दाखल झाले आहेत. आपली प्रकृती ठीक नसल्यानं खटला लढण्यासाठी मुंबईला जाऊ शकत नाही. त्यामुळे पाटण्यातच एफआयआक दाखल केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी रिया चक्रवर्तीची ११ तास चौकशी केली आहे. या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी काही दिवसांपूर्वी रियानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे केली आहे. सुशांतनं १४ जूनला मुंबईतल्या त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी वांद्रे पोलिसांकड़ून सध्या दिग्दर्शक, निर्मात्यांची चौकशी सुरु आहे. आतापर्यंत ३७ हून अधिक जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यात महेश भट्ट यांच्या चौकशीनंतर मंगळवारी दिग्दर्शक करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्वा मेहता यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. त्यांची अंबोली पोलीस ठाण्यात तीन तास चौकशी करण्यात आली. तसेच ड्राइव्ह चित्रपटादरम्यान धर्मा प्रॉडक्शनसोबत सुशांतचा वाद झाला होता, अशी माहिती सुशांतच्या व्यवस्थापकांच्या चौकशीतून समोर आली होती. याबाबतच मेहता यांच्याकडे चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांनीही सर्व आरोप फेटाळले आहे. तसेच सुशांतसोबतच्या ड्राईव्ह चित्रपटासंदर्भातील कराराची प्रतही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. आठवड् अखेरीस करण जोहरचीही चौकशी करण्यात येणार आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात अजित पवारांचे पुत्र पार्थ यांची उडी; गृहमंत्री अनिल देशमुखांची घेतली भेटसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी निर्माता-दिग्दर्शक करण जोहरची चौकशी होणार!