जयपुर : बॉलिवूडला चटका लावून जाणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर अभिनेता सलमान खान, करन जोहरसह ८ जणांवर खटला दाखल करण्यात आला असतानाच आता करणी सेना आखाड्यात उतरली आहे. सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी राजस्थानच्या राजपुतांनी लढाईची घोषणा केली आहे.
करणी सेनेने गेल्या दशकभरापासून बॉलिवूडला हैरान केले आहे. सिनेमांना विरोध, हिंसक आंदोलने यामुळे बॉलिवूडमध्ये या संघटनेची मोठी दहशत आहे. आता करणी सेनेने सुशांत सिंगसाठी लढ्य़ाची घोषणा केल्याने वातावरण चिघळण्याची शक्यता आहे. राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष महिपाल सिंग मकराना यांनी एका व्हिडीओद्वारे लढाई छे़डताना लवकरच पुढील दिशा सांगितली जाईल असे म्हटले आहे.
सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू 14 जूनला मुंबईमध्ये झाला होता. सुशांतने बेडरुममध्ये गळफास लावून घेतला होता. या घटनेमुळे देशभरात हळहळ व्यक्त केली गेली. यानंतर मात्र, बॉलिवुडमधील माफियांविरोधात आवाज उठू लागला. सुशांतचा मृत्यू नाही हत्या असल्याचे आरोप मोठमोठ्या अभिनेत्री, दिग्दर्शकांनी केले. यामध्ये सलमान खान, करम जोहर, एकता कपूर, संजय लीला भन्साळी यांची नावे येऊ लागली. बिहारमध्ये एका वकीलाने तर त्यांच्याविरोधात खटलाच दाखल केला.
आता करणी सेनेने रणशिंग फुंकले आहे. महिपाल यांनी सांगितले की, जर तुम्ही क्षत्रियांची साथ दिली तर ते तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे राहतील. देशभरात क्षत्रियांसोबत काय केले जात आहे, याचे सुशांत जिवंत उदाहरण आहे. सुशांतने भलेही पद्मावती मुद्द्यावरून आडनाव हटविले होते. मात्र, नंतर त्याने दोनदा माफी मागून पुन्हा आडनाव जोडले होते. तो आमचा भाऊ होता. सुशांतला आत्महत्या करण्यासाठी भाग पाडले गेले. हे तेच लोक आहेत ज्यांच्या नादाला लागून त्यांच्या नादाला लागून राजपूत नाव हटविले होते. त्याच लोकांनी सुशांतला मारले. जे राजपूत आघाडीवर आहेत त्यांना लक्ष्य केले जात आहे. एवढा त्रास दिला जातोय की, त्याला आत्महत्या करावी लागतेय.
लढाईची घोषणाज्या समाजाने देशासाठी आपले सर्वस्व दिले त्यांच्याशीच असे वागले जात आहे. हा अन्याय आता सहन केला जाणार नाही. सुशांत असो की महाराणा प्रताप, महाराणा प्रतापांच्या स्वाभिमानासाठी लढत आहोत. आता सुशांतच्याही स्वाभिमानासाठी लढणार. पुढील काही दिवसांत आपल्याला काय करायचे आहे, हे सांगेन असे मकरना यांनी सांगितले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
शक्तीहीन कोरोना! "वाघाचा जंगली मांजर बनला"; मोठ्या तज्ज्ञ डॉक्टरांचा दावा
चीनच्या षडयंत्राला बळ देऊ नका; नरेंद्र मोदींना मनमोहन सिंहांचा सल्लावजा इशारा
देशाशी नडला, महाराष्ट्राने झोडला! चीनच्या ग्रेट वॉल मोटर्ससह तीन प्रकल्प थांबवले
चीनला खुमखुमी! भारतानंतर जपानवर डोळा; आशिया खंडावर दाटले महायुद्धाचे ढग
मगरमिठी! निम्म्याहून अधिक जगावर चीनच्या कर्जाचा डोंगर; भारतात एवढा नंबर
High अलर्ट! भारतावर सर्वांत मोठ्या सायबर हल्ल्याची शक्यता; मोठ्या संकटाचा इशारा
२५ हजारांपेक्षाही स्वस्त किंमतीत OnePlus चा फोन येणार; एकापेक्षा एक धासू फिचर देणार