छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंत यशस्वी प्रवास करणारा सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला. कूपर रुग्णालयात सुशांतच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम करण्यात आलं. यामधून त्यानं आत्महत्याच केल्याचं समोर आलं आहे. सुशांतच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतवर मानसोपचार सुरू होते. त्याबद्दलची काही कागदपत्रदेखील त्याच्या घरात पोलिसांनी सापडली. त्यामुळे नैराश्यातून त्याने टोकाचं पाऊल उचललं असावं, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. याच दरम्यान एका माजी खासदाराने धक्कादायक विधान केलं आहे. सुशांतची हत्या करण्यात आल्याचं म्हटलं आहे.
जन अधिकार पक्षाचे नेते आणि बिहारमधील माजी खासदार पप्पू यादव यांनी सुशांतच्या आत्महत्येसंदर्भात एक धक्कादायक दावा केला आहे. 'सुशांत सिंह राजपूत हा कधीही आत्महत्या करू शकत नाही. त्याची हत्या करण्यात आली आहे' असं पप्पू यादव यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी या घटनेची सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील केली आहे. सुशांतच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं आहे.
'बिहारचा गौरव असलेला सुशांत सिंह राजपूत आत्महत्या करू शकत नाही. त्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हायला हवी. पाटणातील त्याच्या घरी जाऊन सुशांतच्या वडिलांची भेट घेतली. त्यांची मागणी आहे की, याची सीबीआय चौकशी व्हायला हवी. घटनेच्या दोन तास आधी सुशांतसोबत त्यांचं बोलणं झालं होतं. आत्महत्या करण्यासारखं कोणतंही कारण नव्हतं. कुटुंबीयांना भेटून भावना विवश झालो आहे' असं ट्विट पप्पू यादव यांनी केलं आहे.
सुशांतने रविवारी सकाळी त्याच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या घरातून पोलिसांनी कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही. मध्यरात्री त्याने एका अभिनेत्याला शेवटचा फोन केला होता. मात्र त्या अभिनेत्याने फोन उचलला नाही. त्यामुळे दोघांचं बोलणं होऊ शकलं नाही. सुशांतला गेल्या 6 महिन्यांपासून नैराश्याने ग्रासल्याची माहिती पोलिसांनी दिली.
रविवारी सकाळी दहाच्या सुमारास सुशांतनं ज्युस मागवला. त्यानंतर तो त्याच्या खोलीत गेला. सुशांत बराच वेळ बाहेर आला नाही. त्यामुळे त्याच्या मित्रांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला. पण दरवाजा लॉक होता. अखेर घरातील नोकरांनी चावी तयार करणाऱ्याला बोलावलं. त्यानंतर दार उघडण्यात आलं. त्यावेळी सुशांतचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर नोकरांनी याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. सुशांतच्या वांद्रे येथील घरात चार जण राहतात. त्यामध्ये दोन आचारी, एक नोकर आणि एका आर्ट डिझायनराचा समावेश आहे. हा आर्ट डिझायनर सुशांतचा मित्र आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : दिलासादायक! घरच्या घरीही करता येणार कोरोनावर मात; डॉक्टरांनी दिला मोलाचा सल्ला
CoronaVirus News : अरे व्वा! तब्बल 18 दिवस व्हेंटिलेटरवर असलेल्या बाळाने जिंकली कोरोनाची लढाई
पाकिस्तानातील गाढवांची संख्या वाढली; 'या' देशासाठी फायदेशीर ठरली
CoronaVirus News : कोरोनाचा धोका वाढतोय! 'ही' दोन लक्षणं असल्यास वेळीच व्हा सावध; नाहीतर...
माणुसकीला काळीमा! फोटोसाठी छाव्याचे केले असे हाल; अवस्था पाहून डोळ्यात येईल पाणी