मुंबई : सुशांतसिंग राजपूतने ‘चंदामामा दूर के’ या चित्रपटाची जोरदार तयारी चालविली आहे. स्पेस अॅडव्हेंचर असलेल्या या चित्रपटातील भूमिकेत जान यावी यासाठी सुशांत अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’मध्ये महिनाभर प्रशिक्षण घेणार आहे.संजय पुरणसिंग चौहान हे हा चित्रपट दिग्दर्शित करीत आहेत. सुशांतने सांगितले की, या चित्रपटात मी एका अंतराळवीराची भूमिका करीत आहे. याच आठवड्यात मी सिम्युलेटरवर त्यासंबंधीचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. संजयने मला १५ पुस्तके आणि ८ माहितीपट अभ्यासासाठी दिले होते. १९८९ सालचा ‘फॉर आॅल मॅनकाइंड’ हा नासाच्या अपोलो मोहिमेवरचा माहितीपटही त्यात होता. अंतराळवीरांचे जीवन समजून घेण्यासाठी ही सामग्री संजयने मला पुरविली होती. या पुढचे प्रशिक्षण मी आता थेट नासामध्ये जाऊनच घेणार आहे. संजय नासाच्या संपर्कात आहे. मी नासात महिनाभर राहून अंतराळवीरांची देहबोली आणि विचार करण्याची पद्धती समजून घेईन. संजयने मला आधीच एक गणवेश दिला आहे. मी तो दररोज घालतो.
सुशांतसिंग ‘नासा’त घेणार प्रशिक्षण
By admin | Published: January 22, 2017 2:01 AM