पटना - बिहारच्या राजकारणात राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांची केमिस्ट्री इतरांपेक्षा काही वेगळी आहे. गेल्या कित्येक दशकांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. लालूप्रसाद यादव तुरुंगात गेल्यानंतर आता सुशीलकुमार मोदी यांनी लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आणि विरोधी पक्ष नेते तेजस्वी यादव यांना लक्ष्य केले आहे. सुशीलकुमार मोदींनी नेहमीच लालू कुटुंबीयांवर निशाणा साधला आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
गेल्या काही दिवसांपासून बिहारमधील राजकीय चर्चांना ऊत आला आहे. यामध्ये लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबड़ी देवी आणि तेजस्वी यादव यांनीही सत्ताधारी नितीशकुमार सरकारवर हल्लाबोल चढविला आहे. राबडी देवी यांनी नुकतेच एक ट्विट करून उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदींवर निशाणा साधला आहे. कोरोनाला घाबरून कुठे लपून बसलाय सुशील मोदीजी, लवकर बाहेर पडा, असे राबडी देवी यांनी म्हटले आहे.
राबडी देवी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सुशील मोदींवर टीका केली. यावेळी "सुशील मोदींनी घराबाहेर पडले पाहिजे, त्यांना कोरोना होणार नाही. कारण, सुशील मोदींजवळ 'लालू कवच' आहे. ते दिवसातून ७२००० हजारवेळा 'शक्तिशाली लालू मंत्राचे' पठण करतात आणि कोरोनापासून लांब राहातात", असे ट्विट राबडी देवी यांनी केले आहे.
याआधी सुशीलकुमार मोदींनी लालूप्रसाद यादव यांच्यावर केलेल्या ट्विटवरूनही तेजस्वी यादव आणि राबरी देवी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. सुशीलकुमार मोदींनी आपल्या ट्विटमध्ये लालू प्रसाद यादव यांच्यावर टीका करताना लालूजींनी आपल्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत रुग्णालये का बांधली नाहीत? असा सवाल केला होता. यावर तेजस्वी यादव यांनी रिट्वीट करून १५ वर्षात लालू प्रसाद यादव यांनी रुग्णालयांमध्ये पायाभूत सुविधा व सर्व सुविधा पुरविल्या. मात्र, नितीशकुमार सरकारच्या कार्यकाळात सर्व रुग्णालयांचा सत्यानाश झाला, असे म्हटले आहे.
आणखी बातम्या...
आपले प्रेरणादायी शब्द उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरतील, उद्धव ठाकरेंनी मानले नरेंद्र मोदींचे आभार
पब्जीसह २७५ चिनी अॅप्सवर बंदी? सरकार चीनला पुन्हा दणका देण्याच्या तयारीत
'ये दोस्ती... हम नही तोडेंगे...', संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
'हत्ती' vs. 'हात'; सरकारच्या विरोधात मतदान करा; बसपाच्या व्हिपने वाढवली काँग्रेसची डोकेदुखी