पुणे : व्यक्ती पदाने मोठी असली तरी तिच्या कृतीवर तिच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो. असाच अनुभव काही दिवसांपूर्वी माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याबाबत राकेश शर्मा या व्यक्तीने घेतला. शर्मा यांच्या मुलीने फॅन्सी ड्रेस स्पर्धेत स्वराज यांच्यासारखा पेहराव केला आणि स्वतः स्वराज यांनी तिचे कौतुकही केले. त्यांनी ट्विटरवर दिलेली ही दाद अनेकांनी रिट्विट केलेली बघायला मिळाली होती. माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री उशिरा हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झाले.छातीत वेदना होत असल्यानं त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 67 वर्षांच्या होत्या. मोदी सरकार 1 मध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून काम करताना स्वराज यांनी त्यांच्या कामानं छाप पाडली होती. स्वराज यांच्या कार्यकालात देशातील जनतेशी त्या ट्विटरच्या माध्यमातून थेट जोडल्या गेल्या होत्या. देशाबाहेर संकटात असणाऱ्या अनेकांना त्यांनी तात्काळ मदत केल्याची उदाहरणेही त्यावेळी बघायला मिळाली. त्यांनी मदत केल्याचे, कौतुक केल्याचे अनेक ट्विट त्या काळात बघायला मिळाले होते. अगदी मृत्यूपूर्वीही काही तास आधी त्या ट्विटरवर कार्यरत होत्या. अशीच एक घटना 2016सालीही बघायला मिळाली होती.
Sushma Swaraj Death : मोठ्या मनाने केले 'त्या' हुबेहूब सुषमा साकारणाऱ्या लहान मुलीचं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2019 6:28 AM