नवी दिल्ली: माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपा नेत्या सुषमा स्वराज यांचं हृदय विकाराच्या धक्क्यानं निधन झालं. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. छातीत वेदना होत असल्यानं त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. विशेष म्हणजे स्वराज यांनी अवघ्या तीन तासांपूर्वीचं राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत भरलेलं ट्विट केलं होतं.मोदी सरकार-१ मध्ये परराष्ट्र मंत्री आपल्या कामानं वेगळा ठसा उमटवणाऱ्या स्वराज यांनी कलम ३७० रद्द केल्याबद्दल मोदी सरकारचं कौतुक केलं होतं. 'प्रधानमंत्रीजी, तुमचं हार्दिक अभिनंदन. मी आयुष्यभर याच दिवसाची वाट पाहात होते,' अशा शब्दांमध्ये स्वराज यांनी काश्मीरमधून ३७० कलम हटवल्याबद्दल मोदींवर स्तुतिसुमनं उधळली होती. कलम ३७० काढून टाकणारं विधेयक राज्यसभेपाठोपाठ लोकसभेतही मंजूर झाल्यानंतर स्वराज यांनी त्यांच्या भावना ट्विटरवर व्यक्त केल्या होत्या.
Sushma Swaraj's Last Tweet: सुषमा स्वराज यांचं शेवटचं ट्विट राष्ट्रप्रेमानं ओतप्रोत भरलेलं; वाचून कराल सलाम!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2019 11:56 PM