नवी दिल्ली, दि. 25 - नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा सध्या भारत दौऱ्यावर आहेत. काल भारत आणि नेपाळमध्ये आठ महत्वपूर्ण करारावर स्वाक्षऱ्याही झाल्या. त्यानंतर हैदराबाद हाऊसमध्ये त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसमवेत एक संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळेस बोलताना देउबांना खोकल्याची उबळ आलेली पाहून भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांना पाणी दिले. नेपाळचे पंतप्रधान देऊबांना बोलताना त्रास होत होता. त्यांच्या बोलण्यावरुन ते दिसतही होतं. सतत येणाऱ्या खोकल्यामुळे त्यांच्या आवाजावर त्याचा परिणाम होत होता. हे सर्व पाहून समोरच बसलेल्या सुषमा स्वराज यांनी कोणाचीही वाट न पाहता स्वत:च उठून त्यांना पाण्याचा ग्लास दिला. काम, पद किंवा दर्जा यापेक्षा माणुसकीने दुसर्यांची कदर करा ही आपल्या देशाच्या संस्कृतीची शिकवण आहे. याच गोष्टीचा अनुभव सुषमा स्वराज यांच्या कृतीतून दिसून आला असे म्हणाले तर वावगे वाटायला नको. सतत खोकल्याचा त्रास होत असतानाही देउबा यांनी आपले वाचन सुरुच ठेवलं होतं. पण त्यांचा त्रास पाहून पंतप्रधान मोदींनी त्यांच्यासमोरील बाटलीचे झाकण उघडले आणि सुषमा स्वराज यांनी बाटलीतील पाणी ग्लासात ओतून देउबांना दिले. हा सर्व प्रकार पाहून देउबाही चकित झाले. वाचन करण्यात व्यस्त असलेल्या देउबांना सुरुवातील सुषमाजी पाणी घेऊन उभ्या आहेत हे कळलेच नाही. थोड्या वेळाने त्यांना पाहून देउबादेखील चकीत झाले. त्यांनी उपस्थितांची माफी मागत पाण्याचा घोट घेतला.सुषमा स्वराज यांच्या या माणुसकीच्या कृत्यामुळे सद्या सोशल मीडियावर त्यांच्यावर कौतुकाची थाप टाकली जात आहे. प्रत्येकजण त्यांच्या या कृतीला सलाम करत आहेत. सुषमा स्वराज सारख्या परराष्ट्रमंत्री मिळाल्याचे काहीनी आभारही व्यक्त केले.
दोन्ही देशांमध्ये हे झाले आहेत करार -50 हजार घरकुलांच्या निर्मितीसाठी आवश्यक ते सहाय्य भारताच्या वतीने पुरविण्यासंबंधी करारभूकंपामुळे उद्ध्वस्त झालेल्या नेपाळमधील शिक्षण संस्थांची नव्याने उभारणी करण्यासाठी मदतीचा करारनेपाळचा सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी पुरातन वास्तूंच्या बांधकामाला सहाय्यभूकंपामुळे नेपाळमधल्या आरोग्य क्षेत्राची झालेली हानी भरून काढण्यासाठी वैद्यकीय संस्थांची उभारणी करण्यासाठी सहाय्यमेची सेतु आणि उभय देशांतील रस्ते वाहतूक कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी भारताच्या मदतीचा करारअंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासंबंधीचा करारमूल्यांकनामध्ये समानता आणण्यासाठी प्रमाणिकरण क्षेत्रात सहकार्य करण्याचा करारभारत आणि नेपाळमधील इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊटंटस् यांच्यामध्ये सामंजस्य करार