नवी दिल्ली : घोटाळ्यात गुंतलेले आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना ब्रिटनमध्ये प्रवासासाठी दस्तऐवज उपलब्ध करवून दिल्याबद्दल विदेशमंत्री सुषमा स्वराज वादाच्या भोवऱ्यात अडकल्या असून, आक्रमक विरोधकांनी राजीनाम्याची मागणी लावून धरल्याचे पाहता सरकारने त्यांचा भक्कम बचाव चालविला आहे.आयपीएल टी-२० क्रिकेटस्पर्धेत बेटिंग आणि पैशाच्या गैरव्यवहारात गुंतलेले ललित मोदी फरार असून, ते भारताला हवे आहेत. या प्रकरणी तपास टाळण्यासाठी ते २०१०पासून लंडनमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांना ब्रिटनमध्ये प्रवास करता यावा यासाठी स्वराज यांनी मूळ भारतीय ब्रिटिश खासदार केट्थ वाझ आणि ब्रिटनचे उच्चायुक्त जेम्स बेव्हन यांच्याशी संपर्क साधल्याचे ई-मेलवरून उघडकीस आल्यानंतर हा वाद उफाळला आहे. फोडण्यात आलेल्या ई-मेलवरून वाझ यांनी सुषमा स्वराज यांचे नाव सांगून ब्रिटनच्या वरिष्ठ स्थलांतरण अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त ब्रिटिश माध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. ई-मेल व्यवहारानंतर ललित मोदींना २४ तासांपेक्षाही कमी कालावधीत सदर दस्तऐवज मिळाले होते. वाझ यांनी स्वराज यांचे पुतणे ज्योतिर्मय कौशल यांना ब्रिटनमध्ये कायद्याच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीही मदत केली होती, अशी माहिती प्रकाशात आली आहे.
सुषमा स्वराज वादाच्या घेऱ्यात
By admin | Published: June 15, 2015 5:26 AM