शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
3
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
5
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
7
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
8
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
10
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
12
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
13
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
14
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
15
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
16
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
17
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
19
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
20
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली

UNमध्ये सुषमा स्वराजांनी फटकारल्यानंतर पाकचा तिळपापड, म्हणे पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवादी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2017 7:52 AM

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह टीका केली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दहशतवादी आहेत, असे एका पाकिस्तानी न्यूज चॅनेलसोबत संवाद साधताना ख्वाजा आसिफ अक्षरशः बरळले आहेत.

नवी दिल्ली -  पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह टीका केली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दहशतवादी आहेत, असे एका पाकिस्तानी न्यूज चॅनेलसोबत संवाद साधताना ख्वाजा आसिफ अक्षरशः बरळले आहेत. एवढंच नाही तर ख्वाजा आसिफ पुढे असेही म्हणाले की, भारतात आरएसएससारखा दहशतवादी संघ सरकार चालवत आहे. 

भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आमच्यावर दहशतवादावरुन आरोप केला आहे मात्र त्यांचे स्वतःचे पंतप्रधान एक दहशतवादी आहेत.  जिओ न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत आसिफ यांनी गुजरात दंगलीचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केलेत. पुढे ते असेही म्हणाले की, दहशतवादी संघटना आरएसएस त्यांच्या देशाला चालवत आहे आणि भाजपा त्यांचा मित्रपक्ष आहे. 

दरम्यान, आसिफ यांनी असा दावा केला आहे की, पाकिस्तानी लष्कर दहशतवादाविरोधात लढत आहे आणि गेल्या 4वर्षांत दहशतवादाविरोधात केलेल्या प्रत्येक कारवाईत त्यांना यश मिळालेले आहे. लष्कर-ए-तोयबा, हाफिज सईद आणि हक्कानी नेटवर्क त्यांच्या देशासाठी ओझं असल्याचेही त्यांनी मान्य केले आहे.

नेमकं काय म्हणाल्या होत्या सुषमा स्वराज?आम्ही वैज्ञानिक तयार केले, तुम्ही दहशतवादी आणि जिहादी तयार केले अशा सणसणीत शब्दांत केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला सुनावलं होतं. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत बोलताना सुषमा स्वराजांनी सडेतोड भाषण करत पाकिस्तानला एकामागोमाग एक चपराक लगावल्या होत्या. यावेळी त्यांनी भारतावर आरोप करणा-या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खान अब्बासी यांना ज्या देशाने दहशतवाद आणि हिंसेच्या सर्व सीमा पार केल्या आहेत तो देश आम्हाला अहिंसा आणि मानवता शिकवत होता, असा टोलाही लगावला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इतकं सर्व होऊनही शांततेसाठी मैत्रीचा हात पुढे केला होता, पण पुढे काय झालं ते सर्वांना माहित आहे अशी आठवण त्यांनी पाकिस्तानला करुन दिली. सोबतच पाकिस्तानला सर्व लक्षात आहे, पण विसरण्याचं नाटक करत असतात अशी टीका केली. 'भारत आणि पाकिस्तान एकत्र स्वतंत्र झाला, पण कधी तुम्ही एकत्र बसून विचार केला आहे का ? भारताने इतकी प्रगती केली पण दहशतवादी देश म्हणून आपली ओळख निर्माण का झाली हा विचार पाकिस्तानने कधी केला आहे का ? असा सवाल सुषमा स्वराजांनी विचारला होता. पाकिस्तानला तोंड देताना आम्ही देशाच्या विकासात कोणतीही हयगय केली नाही असं सुषमा स्वराजांना ठामपणे सांगितलं. आम्ही आयआयटी उभारले पण तुम्ही लष्कर-ए-तोयबा, हिजबूल मुजाहिद्दीन, हक्कानी बनवलं. आम्ही वैज्ञानिक तयार केले, आणि तुम्ही दहशतवादी आणि जिहादी तयार केले अशा शब्दांत सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला सुनावलं होते. जो पैसा तुम्ही दहशतवाद्यांसाठी खर्च करत आहात तो पैसा देशाच्या नागरिकांसाठी वापरलात तर तुमच्या लोकांचं भलं होईल, त्यांचा विकास होईल असा सल्लाच सुषमा स्वराजांनी दिल होता. यावेळी त्यांनी संयुक्त राष्ट्रांना दहशतवाद ही आपली प्रमुख समस्या आहे. त्याच्याविरोधात लढण्यासाठी आपण एकजूट झालो पाहिजे. वेगवेगळ्या नजरेने दहशतवादाकडे पाहणं थांबवलं पाहिजे असं आवाहनही केलं होतं. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ