छतरपूर : मोबाइल चोरल्याच्या संशयावरून एका बालकाला २० फूट खोल विहिरीत लटकविण्यात आले. बालकाने विनवणी केली, दयेची भीक मागितली. मात्र, आरोपीच्या काळजाला पाझर फुटला नाही. एक हात पकडून त्याने पाच मिनिटे बालकाला विहिरीत लटकवून ठेवले. छतरपूर जिल्ह्यातील अक्टौहा येथे रविवारी ही खळबळजनक घटना घडली. कहर म्हणजे पोलीस चौकीच्या प्रमुखांनी ही घटना कॅमेऱ्यात कैद करणाऱ्यालाच मारहाण केली.
मोबाइल चोरल्याचा संशय; अल्पवयीन मुलाला विहिरीत लटकवले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 9:24 AM