चंदीगढ- आयएसआयसाठी काम करणाऱ्या एका संशयित व्यक्तीला बटाला पोलिसांनी पंजाबमधून अटक केलं आहे. गुरुमुख सिंह असं संशयीताचं नाव असून तो आयएसआयच्या संपर्कात असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पुरियान खूराद या गावाजवळ सापळा रचून त्याला पोलिसांनी त्याला अटक केली. भारतीय लष्कराची माहिती पाकिस्तानाला पुरवल्याचा आरोप या संशयीत एजंटवर करण्यात आला आहे.
गुरुमुख सिंह हा भारतीय असून तो पाकिस्तानला जाऊन आला आहे. पाकिस्तानात गेल्यानंतर त्याने तेथील गुप्तचर यंत्रणांनी संपर्क साधला होता. भारतीय लष्कराची सुरक्षा विषयक महत्वाची माहिती त्याने पाकिस्तानला पुरवल्याचा संशयही असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
गुरुमुख सिंह हा कंटरपंथी शीख समुहाबरोबर पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. तेथे त्याने आयएसआयशी संपर्क साधला, त्यानंतर तेथे त्याला भारतीय लष्काराबाबत महिती घेण्यास सांगण्यात आलं होतं, अशी माहिती बटालाचे पोलीस अधीक्षक इंद्रजीत सिंह गुहमन यांनी दिली आहे.
2009 आणि 2012 मध्ये गुरूमुख सिंह पाकिस्तानात गेला होता. तेथून परतल्यानंतर तो आयएसआयच्या सदस्यांशी नेहमची बोलायचा. भारतीय लष्कराची हालचाल, लष्कराच्या गांड्याचे फोटो, बॉर्डरवर असलेले लष्करी कॅम्प आणि त्यांच्या ठिकाणांचे फोटो काढून तो आयएसआयला पाठवायचा, अशी माहिती समोर येते आहे.