कानपूर : रॅगिंगच्या आरोपांवरून इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीने (आयआयटी) २२ विद्यार्थ्यांना एक ते तीन वर्षांसाठी निलंबित केले आहे. सिनेट बैठकीत हा निर्णय झाला. १६ विद्यार्थी ३ वर्षांसाठी, तर सहा विद्यार्थी एका वर्षासाठी निलंबित झाले आहेत.१६ विद्यार्थ्यांना आरोप गंभीर असल्यामुळे तीन वर्षांसाठी संस्थेतून काढून टाकण्यात आले आहे. निलंबन काळात त्यांना दयेचा अर्ज करण्याचा हक्क नाही. निलंबन संपल्यानंतर ते अर्ज करू शकतील; अभ्यासक्रमाला प्रवेशही मिळवू शकतील.
रॅगिंगवरून २२ विद्यार्थी एक ते तीन वर्षांसाठी निलंबित निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:38 AM