मदुराई : आगामी शैक्षणिक वर्षासाठी देशभरातील वैद्यकीय प्रवेशांसाठी घेण्यात आलेल्या ‘नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट’ (नीट) या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास, मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने बुधवारी स्थगिती दिली.ही परीक्षा दिलेल्या त्रिची येथील एका विद्यार्थिनीने केलेल्या याचिकेवर न्या. एम. व्ही. मुरलीधरन यांनी केंद्र सरकार, मेडिकल कौन्सिल व सीबीएसई यांच्यासह इतर प्रतिवादींना नोटीस काढली व पुढील सुनावणी ७ जून रोजी होईपर्यंत परीक्षेच्या संदर्भात कोणतेही पुढील पाऊल टाकू नये, असा अंतरिम आदेश दिला. ५ जूनला जाहीर होणार होता निकालठरलेल्या वेळापत्रकानुसार ‘नीट’चा निकाल ५ जूनला जाहीर व्हायचा होता. याचा अर्थ असा की, प्रतिवादींनी याच न्यायालयाकडून किंवा सर्वोच्च न्यायालयाकडून ही स्थगिती दरम्यान उठवून घेतली नाही, तर ठरल्या वेळी निकाल लागणार नाही.
‘नीट’ परीक्षेच्या निकालास स्थगिती
By admin | Published: May 25, 2017 2:24 AM