दोन हजार वाहनांवर निलंबनाची कारवाई
By admin | Published: February 28, 2016 10:32 PM
जळगाव : उपप्रादेशिक परिवहन अर्थात आरटीओतर्फे गेल्या दहा महिन्यात एक हजार ९४१ वाहनांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे तर सात हजार ७०८ वाहनांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. वेगवेगळ्या कारणाने वाहनाची नोंदणी, परमीट व लायसन्स निलंबित केले आहेत. यात वाळूचे डंपर, ट्रॅक्टर, अवैध प्रवाशी वाहतुक करणारे वाहने, ट्रक व ट्रॅव्हल्सचा समावेश आहे.
जळगाव : उपप्रादेशिक परिवहन अर्थात आरटीओतर्फे गेल्या दहा महिन्यात एक हजार ९४१ वाहनांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे तर सात हजार ७०८ वाहनांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. वेगवेगळ्या कारणाने वाहनाची नोंदणी, परमीट व लायसन्स निलंबित केले आहेत. यात वाळूचे डंपर, ट्रॅक्टर, अवैध प्रवाशी वाहतुक करणारे वाहने, ट्रक व ट्रॅव्हल्सचा समावेश आहे. एप्रिल २०१५ ते जानेवरी २०१६ या दहा महिन्यात आरटीओच्या भरारी पथकातर्फे राबविण्यात आलेल्या मोहीमेत ही कारवाई करण्यात आली आहे. यात ३४ वाहनांची नोंदणी, २५२ वाहनांचे परमीट व एक हजार ३४७ वाहन चालकांचे लायसन्स निलंबित करण्यात आले आहे. भरारी पथकाने केलेल्या कारवाईत दोन कोटी ४२ लाख रुपयांचा दंड तर दोन कोटी ४१ लाख रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे. कर व दंड मिळून ५ कोटी ६५ लाख रुपयांचा महसूल आरटीओला दहा महिन्यात मिळाला आहे. एक हजार ७२७ वाहने जप्त वाहन रस्त्यावर चालविण्यास सक्षम आहे का यासाठी तपासणी करुन ४७८ वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देण्यात आले होते, तर १४५ वाहनांचे हे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले. क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी वाहून नेणार्या ४५५ तर विना परवानगी प्रवाशी वाहतुक करणार्या ८५४ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. रिफ्लेक्टर नसलेल्या १४८ तर विना हेल्मेटच्या ३८ वाहनधारकांवर कारवाई झाली आहे. वेगवेगळ्या कारणाने एक हजार ७२७ वाहने जप्त करण्यात आली तर निर्धारित मापापेक्षा जास्त भार वाहनार्या ४४५ वाहनांवर कारवाई करण्यात आली. कोट.. ओव्हरलोड तसेच विना परवाना वाळू तसेच अन्य माल वाहून नेणार्या वाहनांची भरारी पथकाकडून नेहमीच तपासणी केली जाते. अशा वाहनांचे थेट निलंबन व परवाना रद्द केला जातो. -विकास बर्हाटे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी असे आहे निलंबन नोंदणी वाहने : ३४४ परमीटची वाहने : २५२ वाहन परवाना : १३४७ एकुण : १९४१