काँग्रेसच्या सात खासदारांचे निलंबन मागे, लोकसभा अध्यक्षांचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 01:53 PM2020-03-11T13:53:43+5:302020-03-11T14:03:34+5:30

Lok Sabha : गेल्या गुरुवारी लोकसभेत अध्यक्षांकडून पत्र काढून घेतल्याप्रकरणी काँग्रेसच्या सात खासदारांचे निलंबन करण्यात आले होते.  

Suspension of seven Congress Lok Sabha MPs has been revoked by Speaker Om Birla rkp | काँग्रेसच्या सात खासदारांचे निलंबन मागे, लोकसभा अध्यक्षांचा निर्णय

काँग्रेसच्या सात खासदारांचे निलंबन मागे, लोकसभा अध्यक्षांचा निर्णय

Next
ठळक मुद्देबुधवारी सर्व पक्षीय बैठक झाली.काँग्रेसच्या सात खासदारांचे निलंबन मागेलोकसभा अध्यक्षांचा निर्णय

नवी दिल्ली : काँग्रेसच्या सात खासदारांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. बुधवारी सर्व पक्षीय बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काँग्रेसच्या सातही खासदारांचे निलंबन मागे घेतले आहे. 

गेल्या आठवड्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राजधानी दिल्लीतील दंगलीच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ पाहायला मिळाला. संसदेचे कामकाज सुरु होताच विरोधकांनी गोंधळ घातला होता. तसेच, गेल्या गुरुवारी लोकसभेत अध्यक्षांकडून पत्र काढून घेतल्याप्रकरणी काँग्रेसच्या सात खासदारांचे निलंबन करण्यात आले होते.  


लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काँग्रेसच्या या सात खासदारांचे निलंबन केले होते. यामध्ये खासदार गौरव गोगोई, टीएन प्रथापन, डीन कुरियाकोसे, आर. उन्निथन, माणिकम टागोर, बेनी बेहनन आणि गुरजितसिंग औजला यांचा समावेश होता. या खासदारांवर गैरवर्तनाच्या आरोपाखाली उर्वरित अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी लोकसभेमधून निलंबन करण्याची कारवाई करण्यात आली होती.


आणखी बातम्या...

वेलकम बॅक... राहुल गांधींच्या 'Hey' ट्विटला महाराष्ट्र भाजपाचं 'ते' उत्तर

Corona Virus : IPL रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

“चिंता नसावी! मध्यप्रदेशचा व्हायरस महाराष्ट्रात घुसणार नाही”

येरवड्यात पोलीस कर्मचार्‍यावर सराईत गुन्हेगारांकडून प्राणघातक हल्ला

 

Web Title: Suspension of seven Congress Lok Sabha MPs has been revoked by Speaker Om Birla rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.