नवी दिल्ली : ओडिशामधील सभेसाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केल्याने आयएएस अधिकारी मोहम्मद मोहसीन यांचे झालेले निलंबन कॅटने स्थगित केले आहे. एसपीजी सुरक्षा असलेल्या व्यक्तींचे वाहनांची तपासणी करू नये असा नियम निवडणूक आयोगाने आखून दिला आहे. मात्र मोहसीन यांनी मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली. त्यामुळे मोदी यांना सुमारे १५ मिनिटांचा खोळंबा झाला. या साऱ्या प्रकाराचा अहवाल संबळपूरच्या प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला मिळाल्यानंतर मोहम्मद मोहसीन यांना निलंबित करण्यात आले होते.
पंतप्रधान मोदींच्या हेलिकॉप्टरची झडती घेणारा आयएएस अधिकारी निलंबित