तृणमूल काँग्रेसचेराज्यसभा खासदार डरेक ओब्रायन यांचे यंदाचे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले आहे. ओब्रायन यांनी राज्यसभेतील रूल बुक फेकल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच ओब्रायन यांनी केलेल्या कृत्याचा निषेधही करण्यात आला आहे.
ओब्रायन यांनी संसदेची मर्यादा भंग केली आहे. यामुळे त्यांचे निलंबन करण्यासाठी मतदान घेण्यात आले. यानंतर त्यांना निलंबित करण्याची घोषणा करण्यात आली. निवडणूक कायदा सुधारणा विधेयकावर चर्चा सुरु होती. तेव्हा ओब्रायन यांनी हे विधेयक मंजूर करण्याच्या मार्गावर आक्षेप घेतला. ते म्हणाले की आम्ही सभागृहाच्या नियमांचे पालन करतो. मात्र, ज्या प्रकारे कृषी विधेयक पास करण्यात आले, त्याच पद्धतीने हे विधेयक देखील पास करण्यात आले आहे.
डरेक ओब्रायन हे यावेळी रागात होते. त्यांनी या रागातून त्यांच्या हातात असलेले संसदेच रुलबुक सेक्रेटरी जनरल यांच्यावर फेकले आणि सभागृहातून बाहेर पडले. यानंतर संसदेत जोरदार गोंधळ उडाला. यानंतर विरोधकांनी राज्यसभेच्या कामकाजावर बहिष्कार घातला आणि बाहेर पडले. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि पियूष गोयल यांनी ओब्रायन यांच्या वागण्यावर टीका केली.