- सुरेश डुग्गर
जम्मू : लष्कराच्या जवानांना घेऊन जाणारी बस लेहजवळ नदीत काेसळून झालेल्या अपघातात ७ जवानांचा मृत्यू झाला. मात्र, हा घातपात असल्याची शक्यता आहे. बस काेसळण्यापूर्वीच बसचालकाने बाहेर उडी मारली. ताे फरार असून, त्याच्याविराेधात गुन्हा दाखल केला आहे.
बसमध्ये महाराष्ट्रातील २ जवानांसह ७ जवानांचा मृत्यू झाला, तर १९ जवान जखमी झाले. अहमद शाह या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बस काेसळण्यापूर्वी त्याने उडी मारून स्वत:चे प्राण वाचविले. मात्र, ताे तेव्हापासून फरार आहे. अपघातातून बचावलेल्या जवानांकडून ही माहिती मिळाली.