नवी दिल्ली : देशात अवयव प्रत्याराेपण करण्यात लिंगभेद हाेत असल्याची धक्कादायक माहिती समाेर आली आहे. देशात वर्ष १९९५ पासून झालेल्या अवयवदानाचा लाभ घेणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण कमी असून ८० टक्के पुरुष आहेत.
आराेग्य मंत्रालयाने लाेकसभेत यासंदर्भात माहिती दिली. त्यानुसार, गेल्या ३० वर्षांमध्ये केवळ २० टक्के महिलांना अवयवदान झाले. त्यातही २०२२मध्ये हे प्रमाण वाढून ३० टक्क्यांपर्यंत हाेते. वायएसआर काॅंग्रेसचे खासदार गाेरांटला माधव यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला हाेता.
सरकारने राष्ट्रीय अवयव प्रत्याराेपण कार्यक्रम सुरू केला आहे. त्यातून अवयवदानाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. लिंगभेद कमी करण्यासाठी आराेग्य मंत्रालयाने जनतेमध्ये संवेदशनशीलता वाढविण्यासाठी प्रयत्न वाढविले आहेत. अवयवदान आणि प्रत्याराेपणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. -एस. पी. सिंह बघेल, आराेग्य राज्यमंत्री