शंका आली अन् कारजवळ गेला; आत डोकावून बघताच बसला धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 05:34 PM2024-08-27T17:34:53+5:302024-08-27T17:37:26+5:30

Couple found dead in the car: रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका टॅक्सीमध्ये कपलचे मृतदेह आढळून आले. ज्या टॅक्सीमध्ये कपल बसलेले होते, त्यात एससी सुरू होता. त्यामुळे मृत्यू कशामुळे झाला, हा प्रश्न उपस्थित होत आहे. 

Suspicious and approached the car; As soon as Man looked inside, man was shocked! | शंका आली अन् कारजवळ गेला; आत डोकावून बघताच बसला धक्का!

शंका आली अन् कारजवळ गेला; आत डोकावून बघताच बसला धक्का!

Crime News in Marathi: एक टॅक्सी उभी होती. संशय आल्याने एकजण जवळ गेला, त्यावेळी धक्काच बसला. टॅक्सीमध्ये एससी सुरू होता आणि महिला आणि पुरुष बेशुद्धावस्थेत पडलेले होते. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस त्यांना रुग्णालयात घेऊन गेले, त्यावेळी कारमध्येच त्यांचा मृत्यू झाल्याचे समजले. एससी सुरू असलेल्या कारमध्ये मृतावस्थेत सापडल्याने मृत्यूचे गूढ वाढले आहे. 

उत्तराखंडची राजधानी देहारादूनमध्ये सोमवारी (२६ ऑगस्ट) ही घटना घडली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत दोघांची राजेश साहू (वय ५०) आणि महेश्वरी देवी (वय ४५) अशी आहेत. हा व्यक्ती टॅक्सी चालक असून, महिलेसोबत त्याचे संबंध होते. 

कारमधील एससी होता सुरू

पोलीस ज्यावेळी घटनास्थळी पोहोचले त्यावेळी कारचे इंजिन सुरूच होते. एससी सुद्धा सुरू होता.  पोलिसांना घटनास्थळी कोणतीही संशयास्पद पुरावा आढळला नाही. 

वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, कार सहस्त्रधारा हेलिपॅडच्या पाठीमागे नागल रोडवर उभी होती. प्राथमिक तपासात असे आढळून आले की,राजेश साहू आणि महेश्वरी देवी हे नशेमध्ये होते. 

मृत्यूचे कारण काय? पोलिसांसमोर मोठे आव्हान

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "दोघांचा मृत्यू कशामुळे झाला, याबद्दल अद्याप काही कळू शकलेले नाही. दोघांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट अजून आलेला नाही."

"राजेश साहूची कार होती. तो टॅक्सी म्हणून तो चालवायचा. महेश्वरी विधवा होती. दोघांचे अफेअर सुरू होते. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळून आली नाही. मृतांच्या कुटुंबीयांनीही कोणतीही शंका उपस्थित केलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे", अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. 

Web Title: Suspicious and approached the car; As soon as Man looked inside, man was shocked!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.